Sangli ACB Trap | 1 हजाराची लाच घेताना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – Sangli ACB Trap | सांगली जिल्ह्यातील मिरज येथील महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्यातील (Mahatma Gandhi Chowk Police Station) सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक (ASI) एक हजार रूपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडला आहे. रिक्षाचालकावर कारवाई न करण्यासाठी त्याने लाच मागितली होती. याप्रकरणी सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau (ACB) Sangli) त्याच्यावर कारवाई केली आहे. रवीशंकर चव्हाण (Ravishankar Chavan) असं सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाचं नाव आहे. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकावर झालेल्या कारवाईमुळे सांगली पोलीस (Sangli Police) दलात खळबळ उडाली आहे. (Sangli ACB Trap)

 

एका वडाप रिक्षाचालकाकडे कारवाई न करण्यासाठी रवी चव्हाण यांनी 1 हजार रुपये लाचेची मागणी 10 जून रोजी केली होती. त्यानंतर संबंधित रिक्षाचालकाने लाचलुचपत विभागाकडे (ACB Sangli) याबाबतची तक्रार नोंदवली होती. त्याची पडताळणी केल्यानंतर 15 जून रोजी महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्याच्या बाहेर सापळा रचून रिक्षाचालकाकडून 1 हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रवीशंकर चव्‍हाण यांना रंगेहाथ पकडले आहे.

 

दरम्यान, याप्रकरणी रवीशंकर चव्हाण यांच्या विरोधात गुन्हा (FIR) दाखल करण्यात आले आहे.
याबाबत माहिती सांगलीचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक सुजय घाटगे (DySP Sujay Ghatge) यांनी दिली.

 

Web Title :- Sangli ACB Trap | assistant sub inspector ASI of police caught taking bribe of 1000 Sangli ACB Trap

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

7th Pay Commission | 18 महिन्याच्या DA एरियरबाबत आली माहिती, कर्मचार्‍यांच्या पगारात येतील 2 लाख रूपये

 

Gold Silver Price Today | जाणून घ्या आजचे सोन्या-चांदीचे दर

 

Devendra Fadnavis On Uddhav Thackeray | “…म्हणून मुख्यमंत्र्यांना राज्यकर्ते म्हणवून घेण्याचा अधिकार नाही” – देवेंद्र फडणवीस