Sangli ACB Trap | 40 हजार रुपयांची लाच घेताना पोलीस उपनिरीक्षक अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – गुन्ह्यात अटक नक करता केवळ नोटीस देवून सोडण्यासाठी 40 हजार रुपये लाच स्विकारताना (Accepting Bribe) पोलीस उपनिरीक्षकाला सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Sangli ACB Trap) सापळा रचून रंगेहाथ पकडण्यात आले. अकबर खताळसो हवालदार PSI Akbar Khatalso Hawaldar (वय 53 रा. मिरज) असे लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. सांगली एसीबीने (Sangli ACB Trap) केलेल्या या कारवाईमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

 

तक्रारदार यांचा भाऊ व इतर दोघांवर विश्रामबाग पोलीस ठाण्यात (Vishram Bagh Police Station) गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात तक्रारदार यांच्या भावाला अटक (Arrest) न करता नोटीस देऊन सोडण्यासाठी तसेच तपासात मदत करण्यसाठी पोलीस उपनिरीक्षक हवालदार याने सुरुवातीला 60 हजार रुपये लाचेची मागणी केली. त्यानंतर तक्रारदार यांनी सांगली एसीबीकडे (Sangli ACB Trap) तक्रार दाखल केली.

 

तक्रारदाराच्या तक्रारीनुसार जानेवारी आणि फेब्रुवी या दोन महिन्यात पडताळणी केली.
त्यावेळी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. तडजोडी अंती 40 हजार रुपये देण्याचे निष्पन्न झाले.
त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक हवालदार याच्यावर विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली.
आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला 23 मार्च पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
Web Title :- Sangli ACB Trap | Police sub-inspector in anti-corruption net while taking bribe of Rs.40 thousand

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Maharashtra Industries Minister Uday Samant | नवीन माहिती तंत्रज्ञान धोरण 15 दिवसात आणणार – मंत्री उदय सामंत

Pankaja Munde | “…मग तुमची ताई पंतप्रधान होऊ शकत नाही का?” पंकजा मुंडेंच्या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा

Bhaskar Jadhav | आता सभागृहात येण्याची इच्छा नाही, विधिमंडळाच्या पायऱ्यांवर नतमस्तक होऊन भास्कर जाधव परतले; नेमकं काय घडलं?