Sangli ACB Trap | 1700 रूपयाची लाच घेताना नागरी सुविधा केंद्रातील महिला ऑपरेटरसह तिचा मुलगा अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – नॉन क्रीमीलेयर दाखल्याचे प्रकरण प्रांत कार्यालयात पाठवण्यासाठी 1700 रुपये लाच घेताना (Accepting Bribe) विटा तहसील कार्यालयातील (Vita Tehsil Office) नागरी सुविधा केंद्रातील महिला ऑपरेटरसह (Female Operator) तिच्या मुलाला सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Sangli ACB Trap) रंगेहात पकडले. सांगली एसीबीने (Sangli ACB Trap) ही कारवाई मंगळवारी (दि.6) महिलेच्या कार्यालयात सापळा रचून केली.

 

पूजा किशोर साळुंखे Pooja Kishore Salunkhe (वय-52) व प्रतीक किशोर साळुंखे Pratik Kishor Salunkhe (वय-28 दोघे रा. सावरकरनगर, विटा) अशी लाच घेताना पकडण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. त्यांच्याविरोधात विटा पोलीस ठाण्यात (Vita Police Station) भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमांतर्गत (Prevention of Corruption Act) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. याबाबत विटा परिसरातील तक्रारदाराने सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (Sangli ACB Trap) तक्रार केली आहे.

 

तक्रारदार यांच्या भावाचा नॉन क्रीमीलेयर दाखला (Non-Creamy Layer Certificate) काढायचा होता. यासाठी त्यांनी विटा तहसील कार्यालयातील सेतू कार्यालयाशी संपर्क साधला. दाखला काढून देण्याचे प्रकरण प्रांत कार्यालयात पाठवण्यासाठी पूजा साळुंखे यांनी दोन हजार रुपये लाच मागितली. तडजोडीअंती सतराशे रुपये देण्याचे ठरले. तक्रारदार यांनी सांगली एसीबीकडे तक्रार केली.

पथकाने पडताळणी केली असता पूजा साळुखे यांनी लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.
पथकाने मंगळवारी कार्यालयात सापळा रचला.
तक्रारदार यांना लाचेची रक्कम त्यांचा मुलगा प्रतीक याच्याकडे देण्यास सांगितली.
तक्रारदार यांच्याकडून लाच घेताना प्रतीक याला ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर पूजा साळुंखे यांना ताब्यात घेण्यात आले.

 

ही कारवाई पोलीस उपअधीक्षक सुरज घाटगे (DySP Suraj Ghatge), पोलीस निरीक्षक विनायक भिलारे (Police Inspector Vinayak Bhilare),
दत्तात्रय पुजारी (Police Inspector Dattatraya Pujari,), अंमलदार अविनाश सागर, संजय संकपाळ,
सीमा माने, धनंजय खाडे, प्रितम चौगुले, अनिस वंटमुरे यांच्या पथकाने केली.

 

Web Title :- Sangli ACB Trap | sangli female operator in arrested in bribe case with his son sangli acb trap

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Swati Deval | ‘माझी तुझी रेशीमगाठ’मधील ‘या’ अभिनेत्रीची सर्जरी; रग्णालयातून पोस्ट शेअर करत दिली माहिती

Kul kayda – Land Sell | आता कूळकायद्यातील जमिनीही विकता येणार; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

Pune Crime | ‘तू माझी नाही झाली तर कोणाची होऊ देणार नाही’ ! युवतीला धमकावुन तोंडावर अ‍ॅसीड फेकण्याची धमकी