Sangli ACB Trap | 7/12 उताऱ्यावरील दुरुस्तीसाठी 15 हजार रुपये लाच घेताना महिला तलाठी अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – शेत जमिनीच्या सातबारा उताऱ्यावरील आणेवारी दुरुस्त करण्यासाठी 15 हजार रुपये लाच घेताना (Accepting Bribe) कडेगाव तालुक्यातील खेराडेवांगी येथील महिला तलाठी (Women Talathi) सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Sangli ACB Trap) रंगेहाथ पकडले. मनिषा मोहनराव कुलकर्णी Manisha Mohanrao Kulkarni (वय-37 रा. इस्लामपूर, ता. वाळवा) असे लाच घेताना पकडण्यात आलेल्या महिला तलाठ्याचे नाव आहे. सांगली एसीबीच्या पथकाने (Sangli ACB Trap) ही कारवाई सोमवारी (दि.10) खेराडेवांगी ग्रामपंचायत कार्यालयात सापळा रचून केली.

 

याबाबत एका शेतकऱ्याने सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (Anti Corruption Bureau (ACB) Sangli) केली. तक्रारदार यांच्या वडिलांची जमीन शासनाने पुनर्वसनासाठी संपादित केली होती. भूसंपादन करताना जमीनीच्या सातबारा उताऱ्यावर चुकीची आणेवारी नोंद झाली होती. यामध्ये दुरुस्ती करण्यासाठी खेराडेवांगी तलाठी मनिषा कुलकर्णी यांच्याकडे अर्ज केला होता. कुलकर्णी यांनी उताऱ्यावरील आणेवारीची दुरुस्ती करण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे 15 हजार रुपये लाच मागितली. तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी सांगली एसीबीकडे (Sangli ACB Trap) तक्रार केली.

 

सांगली एसीबीच्या युनिटने पंचासमक्ष पडताळणी केली असता तलाठी मनिषा कुलकर्णी यांनी 7/12 उताऱ्यावरील आणेवारीची दुरुस्ती करण्यासाठी 15 हजार रुपये मागितल्याचे निष्पन्न झाले. पथकाने सोमवारी खेराडेवांगी ग्रामपंचायत कार्यालयात (Kherade Wangi Gram Panchayat Office) सापळा रचून मनिषा कुलकर्णी यांना तक्रारदार यांच्याकडून 15 हजार रुपये लाच घेताना रंगेहाथ पकडले. कुलकर्णी यांच्यावर कडेगाव पोलीस ठाण्यात (Kadegaon Police Station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे (Pune ACB SP Rajesh Bansode),
अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव (Addl SP Suraj Gurav)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधीक्षक सुजय घाटगे (Deputy Superintendent of Police Sujay Ghatge),
पोलीस निरीक्षक दत्तात्रय पुजारी (Police Inspector Dattatraya Pujari), हवालदार अविनाश सागर,
सलीम मकानदार, सीमा माने, संजय संकपाळ, प्रीतम चौगुले, स्वप्नील भोसले यांच्या पथकाने केली.

 

Web Title :- Sangli ACB Trap | talathi manisha kulkarni of kheradevangi
kadegaon taluka was arrested while accepting a bribe of 15000

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा