Sangli ACB Trap | 45 हजार रुपये लाच घेताना ‘महावितरण’चे दोन अधिकारी अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – सोलर जोडणीची फाईल मंजूर करुन देण्याच्या मोबदल्यात 45 हजार रुपये लाच स्विकारताना (Accepting Bribe) महावितरणच्या (Mahavitran) दोन अधिकाऱ्यांना सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Sangli ACB Trap) सापळा रचून रंगेहाथ पकडले. उप कार्यकारी अभियंता (Deputy Executive Engineer) अतुल श्रीरंग पेठकर Atul Srirang Pethkar (वय-40 रा. कासार गल्ली, तासगाव) व सहायक अभियंता (Assistant Engineer) सागर विलास चव्हाण Sagar Vilas Chavan (वय-34 रा. नवेखेड, ता. वाळवा) अशी लाच घेताना रंगेहाथ पकडलेल्या अधिकाऱ्यांची नावे आहेत. सांगली एसबीच्या पथकाने (Sangli ACB Trap) ही कारवाई पलूस येथील महावितरणच्या उपविभागीय कार्यालयात (Sub-Divisional Office Palus) सापळा रचून केली.

 

तक्रारदार यांची सोलर जोडणीची कंपनी आहे. या कंपनीच्या मार्फत जोडण्यात आलेल्या सोलर इन्टॉलेशनची फाईल मंजुरीसाठी पलूस उपविभागीय कार्यालयात उपकार्यकारी अभियंता म्हणून कार्यरत असलेल्या अतुल पेठकर व सहायक अभियंता सागर चव्हाण यांनी तक्रारदार यांच्याकडे 45 हजार रुपयांची मागणी केली. त्यानंतर तक्रारदार यांनी सांगली एसीबीकडे (Sangli ACB Trap) तक्रार केली. सांगली युनिटने पडताळणी केली असता पेठकर व चव्हाण यांनी 45 हजार रुपये लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.

 

बुधवारी (दि.19) महावितरणच्या पलूस उपविभागीय कार्यालयात सापळा लावण्यात आला. पेठकर यांने तक्रारदार यांच्याकडून लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. यानंतर सागर चव्हाण यालाही ताब्यात घेण्यात आले. दोघांवर पलूस पोलीस ठाण्यात (Palus Police Station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे (Pune ACB SP Rajesh Bansode),
अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव (Addl SP Suraj Gurav)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधीक्षक सुजय घाटगे (Deputy Superintendent of Police Sujay Ghatge),
पोलीस निरीक्षक दत्तात्रय पुजारी (Police Inspector Dattatraya Pujari),
पोलीस निरीक्षक विनायक भिलारे (Police Inspector Vinayak Bhilare),
हवालदार अविनाश सागर, सलीम मकानदार, धनंजय खाडे, राधीका माने, संजय संकपाळ,
प्रितम चौगुले, रविंद्र धुमाळ, अजित पाटील, विणा जाधव, चालक भोसले यांच्या पथकाने केली.

 

Web Title :- Sangli ACB Trap | Two officers of ‘Mahavitran’ caught in anti-corruption net while taking Rs 45 thousand bribe

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा