Sangli Accident News | दुर्दैवी ! सांगलीच्या जवानाचा अपघातात मृत्यू

जबलपूर : Sangli Accident News | आज दुपारी बारा वाजताच्या सुमारास जबलपूरजवळ सैन्य दलाच्या गाडीला झालेल्या भीषण अपघातात (Jabalpur Army Vehicle Accident) सांगली जिल्ह्यातील जवानाचा मृत्यू झाला आहे. ही गाडी जबलपूरहून बंगळुरूला जात होती. यावेळी मागून आलेल्या भरधाव टँकरने गाडीला धडक दिली. या अपघातात (Sangli Accident News) एकजण जखमी झाला आहे.

पॅरा कमांडोचे हवालदार पोपट भगवान खोत (Para Commando Parrot Bhagwan Khot) यांचा या अपघातात मृत्यू झाला आहे. ते सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातील लोणारवाडी गावचे सुपुत्र होते. अपघातानंतर त्यांना रुग्णालयात पोहचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. जवान पोपट भगवान खोत यांच्या मृत्यूच्या वृत्ताने कवठेमहांकाळ तालुक्यावर शोककळा पसरली आहे.

३४ वर्षीय जवान पोपट खोत हे अत्यंत हुशार आणि मनमिळावू होते. प्रचंड मेहनतीच्या बळावर ते भारतीय सैन्यात
(Indian Army) भरती झाले होते. परिसरात त्यांचे कौतुक होत असे. त्यांच्या अपघाती (Sangli Accident News)
मृत्यूने हळहळ व्यक्त होत आहे.

पोपट खोत यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, आई आणि बहिणी असा परिवार आहे. त्यांचे पार्थिव लोणारवाडी येथे
आणले जाणार आहे. कर्तव्य बजावत असताना पोपट खोत यांचा अपघाती मृत्यू झाल्याने त्यांच्या पार्थिवावर
शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | अल्पवयीन प्रेयसीला भेटण्यासाठी बुरखा घालून शाळेत गेला, मुलं चोरणारा समजून लोकांनी बेदम बदडलं; पुण्यातील घटना

Pune SPPU News | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारात जमावबंदी, विद्यापीठात घडलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा आदेश

Hasan Mushrif On Raju Shetti | राजू शेट्टींच्या आंदोलनावर मुश्रीफांची प्रतिक्रिया, ”मला रात्रीची झोप लागत नाही, कर्ज इतके….”