Sangli Accident News | भरधाव कार रसवंतीगृहात घुसल्याने शाळकरी मुलाचा दुर्दैवी मृत्यू

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन – सांगली (Sangli Accident News) जिल्ह्यात पलूस तालुक्यातील खंडोबाचीवाडी या ठिकाणी एक भीषण अपघात झाला आहे. यामध्ये भरधाव कार थेट रसवंतीगृहाच्या शेडमध्ये घुसल्याने एका शाळकरी विद्यार्थ्याला आपला जीव गमवावा लागला आहे. समर्थ संतोष शिंदे Samarth Santosh Shinde (वय 11) असे या अपघातात मृत पावलेल्या विद्यार्थ्यांचे नाव आहे. रविवारी हा अपघात झाला आहे. या प्रकरणी भिलवडी पोलिस ठाण्यात (Bhilwadi Police Station) नोंद करण्यात आली आहे. या अपघातानंतर (Sangli Accident News) कार चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे.

काय घडले नेमके?
तासगांव भिलवडी रोडवर खंडोबाचीवाडीत (Khandobachiwadi) नायरा पेट्रोल पंपाजवळ असणाऱ्या शेताच्या कडेला संतोष गोपाळ शिंदे (Santosh Gopal Shinde) यांचे रसवंतीगृह आहे.
या रसवंतीगृहात संतोष शिंदे यांचा मुलगा समर्थ बसला होता.
यादरम्यान भिलवडी स्टेशनकडून भरधाव वेगाने जाणारी सियाज कार (एमएच-10-सीएक्स-4081)
अचानक रसवंती गृहाच्या शेडमध्ये घुसली. हि कार एवढ्या वेगात होती कि ती रसवंती गृहाचे पत्र्याचे शेड उचकटून शेतामध्ये कोसळली.

या कारने रसवंतीगृहात बसलेल्या समर्थला फरफटत नेले. यादरम्यान गाडीच्या पुढच्या चाकाखाली आल्याने
समर्थचा जागीच मृत्यू झाला. समर्थ हा खंडोबाचीवाडी विद्यालयात इयत्ता पाचवीच्या वर्गात शिकत होता.
अपघातानंतर ग्रामस्थांची होणारी गर्दी पाहून आरोपी कार चालक घटनास्थवरून फरार झाला.
या अपघाताप्रकरणी भिलवडी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भिलवडी पोलिस आरोपी कारचालकाचा शोध घेत आहेत.

Web Title :   Sangli Accident News | school boy died on the spot after a speeding car rammed directly into raswantigruh in palus taluka sangli

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Dnyanoba Tukaram Award | सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते ह.भ.प.बद्रीनाथ तनपुरे, स्वामी श्री गोविंददेव गिरी, महंत बाभूळगांवकर शास्त्री यांना ज्ञानोबा-तुकाराम पुरस्कार प्रदान

Pune Crime News | पुण्याचे माजी महापौर आणि भाजपचे प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ यांच्या नावाने बिल्डरकडे 3 कोटींच्या खंडणीची मागणी; जाणून घ्या प्रकरण