सांगली : वाहतूक पोलीस खून प्रकरणातील आरोपींची कळंबा कारागृहात रवानगी

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन

वाहतूक पोलीस शिपाई समाधान मांटे खून प्रकरणातील आरोपींची रवानगी कळंबा कारागृहात करण्यात आली. या गुन्ह्यामध्ये पुरवा नष्ट केल्याप्रकरणी हॉटेल रत्नाचा मालक कुमार कुमसगे याच्यासह व्यवस्थापक आणि संशयिताचा मेहुणा यांची पोलीस कोठडी मंगळवारी (दि.२४) संपली. त्यांना न्यायालयात हजर केले असता तिघांचीही न्यायालयीन कोठडी देण्यात आली. न्यायालयाच्या आदेशानुसार या तिघांचीही रवानगी कारागृहात करण्यात आली.
[amazon_link asins=’B0784BZ5VY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’1f6d9bd9-8f51-11e8-8f2a-03e3ee111b2b’]

कुमार कुमसगे, व्यवस्थापक शब्बीर नदाफ, वासीम शेख अशी कळंब्याला रवानगी करण्यात आलेल्यांची नावे आहेत. मागील मंगळवारी (दि.१७) रात्री साडेअकराच्या सुमारास दारूच्या बिलाच्या कारणावरून मांटे यांचा सपासप वार करून खून करण्यात आला होता. यातील मुख्य संशयित झाकीर जमादार याला कोल्हापुरातून अटक करण्यात आली होती. तर त्याचे दोन साथीदार राजू नदाफ, अन्सार पठाण यांना दुसर्‍या दिवशीच अटक करण्यात आली होती.

खून केल्यानंतर पळून जाण्यासाठी मदत केल्याप्रकरणी तसेच आसरा दिल्याप्रकरणी झाकीरचा मेहुणा वासीम शेखलाही अटक करण्यात आली होती. तर कुपवाड रस्त्यावरील हॉटेल रत्ना डिलक्स येथे हॉटेलच्या आवारातील मृतदेह हलवून पुरावा नष्ट केल्याप्रकरणी कुमसगेसह शब्बीर नदाफला अटक करण्यात आली होती. तिघांच्याही पोलिस कोठडीची मुदत मंगळवारी संपल्याने त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने तिघांचीही न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. दरम्यान सांगलीतील मध्यवर्ती कारागृहात कैद्यांची संख्या अधिक असल्याने तिघांचीही रवानगी कोल्हापुरातील कळंबा कारागृहात करण्यात आली आहे.