वकिल अग्रवाल यांची आईसह आत्महत्या ; जिल्ह्यात प्रचंड खळबळ

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – मिरज येथील प्रसिध्द वकिल सुनिल अग्रवाल (47) आणि त्यांची आई पुष्पा अग्रवाल (७०, दोघे रा. ब्राम्हणपुरी, मिरज, जि. सांगली) यांनी आत्महत्या केल्याची धक्‍कादाय माहिती समोर आल्याने मिरजेसह संपुर्ण सांगली जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली आहे. अग्रवाल यांच्या आत्महत्येचे कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही.

दि. ३० एप्रिल रोजी सकाळी सुनिल अग्रवाल हे घरातून निघून गेले होते. त्यानंतर ते घरी परतलेच नाहीत. सुनिल यांनी रेल्वेखाली उडी घेवुन तर त्यांच्रूा आई पुष्पा यांनी कृष्णा नदीत उडी मारून आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. मिरज रेल्वे पोलिसांनी आणि स्थानिक पोलिसांनी सुनिल आणि पुष्पा अग्रवाल यांचे मृतदेह त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात दिले आहेत. दरम्यान, अग्रवाल आई आणि मुलाच्या आत्महत्येमुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.