सांगलीत पुन्हा ‘व्हिडीओ गेम’च्या माध्यमातुन लुट

तासगाव : पोलीसनामा ऑनलाइन (राजू थोरात) –  नवीन जिल्हाधिकारी विजयकुमार काळम पाटील व नवीन पोलिस प्रमुख सुहेल शर्मा हे येण्याअगोदर खुले आम विडीवो गेम सेंटर चालु होते. दोन्ही अधिकारी आल्यानंतर सर्वांनी भीतीने जिल्ह्यातील विडीवो गेम सेंटर बंद केले. वर्षापासून बंद करण्यात आलेले जिल्ह्यातील  व्हिडीओ गेमचे जुगार अड्डे गेल्या महीन्याभरांपासून पुन्हा चोरीछुपे सुरू करण्यात आलेले आहेत.

सध्या जिल्ह्यात सांगली, आष्टा, इस्लामपुर, तासगाव विटा, जत व इतर तालुक्याच्या ठिकाणी खुलेआम विडीवो गेम सेंटरच्या नावाखाली जुगार आड्डे चालु आहेत, काही ठिकाणी संगणकवर गेम खेळली जाते त्यात लाखो रुपयाची उलाढाल होते, मात्र विडीवो गेम व संगणक गेम ह्या सर्व विनापरवाना व पोलिसांचा परवाना कोणताही नसताना हे गेम सेंटर चालु कसे असा प्रश्न उपस्तिथ होत आहे.

या गेम सेंटर मध्ये १३ ते २२ वयोगटातीलच मुले आकडे लावून घर उध्वस्त करुण घेत आहेत. काही ठिकाणी वाद होतात त्यामुळे शांतता सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून हे अड्डे तातडीने बंद करण्याची आवश्यकता आहे.

जिल्ह्यात गेल्या काही वर्षात २० ते-२५ ठिकाणी व्हिडीओ गेमचे जुगार अड्डे सुरू करण्यात आलेले आहेत. तालुक्याच्या परिसरातील युवक आणि प्रामुख्याने महाविद्यालयीन विद्यार्थी मोठ्या प्रमाणात या जुगाराच्या आहारी गेल्याचे दिसते. अनेकांनी या जुगाराच्या नादी लागून आपल्या घरादारावर आणि शेतीवाडीवर पाणी सोडल्याची उदाहरणेही भरपूर आहेत. या व्हिडीओ गेममधील सेटिंगमुळे आणि त्या माध्यमातून चालणार्‍या लूटमारीमुळे हे अड्डे नेहमीच वादग्रस्त ठरलेले आहेत. त्या ठिकाणी चालणार्‍या आर्थिक व्यवहाराच्या कारणावरून अनेकवेळा हाणामारीचे प्रसंगही उद्भवतात.

या सगळ्या पार्श्‍वभूमीवर पोलिस अधीक्षक शर्मा यांनी जिल्ह्याचा पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्यांदा जिल्ह्यातील व्हिडीओ गेम सेंटर्सवर कारवाई करून ते बंद केले होते. मागील ६ महिन्यापूर्वी ठीकठिकाणी शर्मा यांच्या पथकाने सर्व जिल्ह्यात धाडी मारल्या पण कायदयाच्या पळवाटा काढून पुन्हा हे गेम सेंटर चालु झाले आहेत.
सांगली शहरात व इतर सर्व  तालुक्यात व्हिडीओ गेम सेंटर्स चोरीछुपे पुन्हा चालू करण्यात आलेली दिसत आहेत. या माध्यमातून दिवसाकाठी लाखो रुपयांची उलाढाल सुरू असून युवक आणि विद्यार्थी पुन्हा या जुगाराच्या आहारी जाताना दिसत आहेत. मात्र पोलिसांसह अन्य महसूल यंत्रणांनी त्याकडे सोयीस्कर कानाडोळा केल्याचे दिसत आहे. या व्हिडीओ गेम चालकांकडून नेहमीप्रमाणे  विद्यार्थीची आणि खेळ खेळणाऱ्यांची लूटमार होत आहेत. त्याचप्रमाणे या कारणावरून वादंग माजण्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळे ही व्हिडीओ गेम सेंटर्स तातडीने बंद करण्याची मागणी होत आहे. याकड़े आता जिल्हा पोलिस प्रमुख सुहेल शर्माजी व जिल्हाधिकारी विजयकुमार काळम पाटील यानी लक्ष देण्याची गरज आहे तरच यावर आळा बसेल व मुलांचे आयुष्य बरबाद होण्यापासून मदत होणार आहे.
पोलिस अधिक्षक सुहेल शर्मा यांनी मध्यतंरी काळात पोलिसांचे इन्सपेक्शनसाठी जिल्ह्यातील प्रतेक पोलिस ठाण्याला भेटी देत होते त्यावेळी त्या त्या भागातील व्हीडीओ गेम सेंटर हे बंद राहत होते. अचानक जर पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा हे कोणत्यातरी तालुक्याच्या दौऱ्यावर असले की तेथील व्हिडिओ गेम ते तात्काळ बंद होतात. मग ह्या व्हिडिओ गेमना कोणाचा आशीर्वाद आहे हा विषय आता चर्चेचा बनला आहे.

अबब… नांदेड जिल्ह्यात चक्क गांजाची शेती ; २ कोटीचा गांजा जप्त