२००० हजार रुपयांची लाच स्विकारताना मुख्याध्यापक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – वेतन पडताळणी करून त्याची नोंद सेवा पुस्तकात करण्यासाठी शिक्षकाकडून दोन हजार रुपयांची लाच स्विकारताना मुख्याध्यापकाला अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई आज सकाळी दहाच्या सुमारास करण्यात आली. महादेव कृष्णा कुंभार (वय-५० रा. पंचशीलनगर, सांगली) असे रंगेहाथ पकडण्यात आलेल्या मुख्याध्यापकाचे नाव आहे.

महादेव कुंभार हे स्वातंत्र्यवीर सावरकर प्रतिष्ठान संचलित अभिनव बालक मंदिर शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्य़रत आहेत. याच शाळेतील तक्रारदार शिक्षक यांना वेतनाची पडताळणी शिक्षण विभागातील लेखाधिकाऱ्यांकडून करून त्याची नोंद सेवा पुस्तकात करुन घेयची होती. वेतन पडताळणी करून सेवा पुस्तकात नोंद करून आणण्यासाठी कुंभार यांनी दोन हजार रुपयांची लाच मागितली. तक्रारदाराने सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याची तक्रार केली. पथकाने पंचासमक्ष पडताळणी केली असता कुंभार याने लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. आज सकाळी लाचेची दोन हजार रुपयाची रक्कम स्विकारताना महादेव कुंभार यांना रंगेहाथ पकडण्यात आले. कुंभार याच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सरकारी कामासाठी लोकसेवक लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या १०६४ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा.

अशा प्रकारेदेखील खावू शकता भाज्या, होतील अनेक फायदे

‘या’ कारणामुळे पावसाळ्यात ‘डोळ्यांच्या समस्या’ निर्माण होतात

दररोज ‘हळदीचे पाणी’ घ्या आणि आश्चर्यकारक फायदे मिळवा

लुक बदलायचायं ? मग ‘या’ मेकअप टीप्स फॉलो करा

You might also like