सांगली : अल्पवयीन मुलीच्या खूनाचा प्रयत्न, एकाला जन्मठेप

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – अल्पवयीन मुलीवर ब्लेडने वार करून तिचा खून करण्याचा प्रयत्न करणाऱ्या कृष्णा पिसाळ यास अतिरिक्त सत्र न्यायाधीश पेरमपल्ली यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
हा गुन्हा ७ एप्रिल २०१८ रोजी जतमधील सातारा फाटी येथे घडला होता. यातील पिडित मुलगी ९ वी त शिकत होती. कृष्णा त्या मुलीच्या शाळेत व्हॉलीबॉल शिकविण्यासाठी येत होता. त्यामुळे त्याची व पिडितेची ओळख होती. घटनेदिवशी पिडिता शाळेत परीक्षेसाठी गेली होती. परीक्षा संपल्यानंतर ती चालत जात होती. यावेळी कृष्णा तिच्या पाठीमागून आला आणि त्याने तुझे लग्न ठरले आहे काय मी तुझ्यासोबत लग्न करणार आहे. तू माझ्यासोबत लग्न करणार आहेस का नाहीस असे म्हणाला.

त्यावेळी पिडितेने मला तुझ्यासोबत लग्न करायचे नाही, मला शिकायचे आहे असे सांगितल्यानंतर त्याने तिला खाली ढकलून दिले व तुला आज ठेवतच नाही असे म्हणून ब्लेडने तिच्या गळ्यावर वार केले. ती मुलगी ओरडू लागल्याने रस्त्यावरील एकजण तिथे धावत आला. त्याने त्या मुलीची सुटका केली व उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. जत पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस उपनिरीक्षक डोंगरे यांनी रुग्णालयात जाऊन त्या मुलीचा जबाब नोंदवला. त्या जबाबाच्या आधारे आरोपीच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला होता. सोमवारी साक्षी-पुराव्यांच्याआधारे आरोपीला शिक्षा जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली.

Visit : Policenama.com