Sangli Caste Issue | खत खरेदी करताना शेतकऱ्यांना जात विचारली? राज्य सरकारने केला खुलासा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शेतकऱ्यांना खत खरेदी करताना त्यांची जात विचारल्याचा (Sangli Caste Issue) प्रकार समोर आल्यानंतर विधिमंडळात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. सांगलीमधील हा प्रकार (Sangli Caste Issue) समोर आल्यांनंतर अजित पवार (Ajit Pawar), पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan), नाना पटोले (Nana Patole) यांनी सरकारला याबाबत जाब विचारला. तसेच अशा पद्धतीने जात विचारली जात असल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. यावर आता राज्य सरकाराने (State Government) तोडगा काढण्याच्या हालचाली सुरु केल्या असून केंद्र सरकारला (Central Government) पत्र पाठवले असल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे.

सांगलीत शेतकऱ्यांना खतविक्रेत्यांकडून रासायनिक खत खरेदीच्या आधी त्याची जात कोणती हे विचारले जात आहे. खताची खरेदी करताना जात सांगण्याची गरज काय (Sangli Caste Issue) असा सवाल विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उपस्थित केला होता. यावर राज्याच्या कृषी विभागाने उत्तर दिले आहे. ही जात नाही तर वर्गवारी (Categories) असल्याचे कृषी विभागाने (Department of Agriculture) म्हटले आहे. तसेच केंद्र सरकारने पॉस मशीनचे नवीन 3.2 सॉफ्टवेअर अपडेट केले आहे. त्यात वर्गवारी हा घटक दिला असून कुणाचीही जात विचारली जात नाही, असा खुलासा कृषी विभागाने केला आहे.

वर्गवारी कशासाठी विचारली जाते याचे स्पष्टिकरण देताना कृषी विभागाने म्हटले की, प्रत्येक वर्गवारीला
लाभ मिळतो की नाही, पाहण्यासाठी केवळ वर्गवारी दिली आहे. जनरल, SC, ST, OBC अशा केवळ वर्गवारी
त्यात आहेत. सर्वांना लाभ मिळावा असा हा हेतू आहे. शेतकऱ्यांना कुठलाही त्रास होऊ नये यासाठी
राज्य सरकारने एक पत्र केंद्र सरकारला पाठवून याबाबत समाधानकारक तोडगा काढण्याची विनंती केली
असल्याचे कृषी विभागाने म्हटले आहे.

Web Title :  Sangli Caste Issue | agriculture department clarify on why caste catagory in e pos new update

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Budget Session | सांगलीतील ‘जात’ प्रकारावरुन विधानसभेत खडाजंगी, मविआच्या आक्रमक नेत्यांना उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी लगावला टोला

Pune PMC Warje Multispeciality Hospital | वारजे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल : ठेकेदारासाठी महापालिकेने कर्ज काढण्यास आमचा विरोध – खासदार सुप्रिया सुळे

MP Imtiyaz Jaleel | एमआयएमचे खासदार इम्‍तियाज जलील यांच्यावर गुन्हा दाखल

Nashik ACB Trap | नाशिक भूमि अभिलेखचे आणखी दोन अधिकारी आणि खासगी एजंट अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

Pune Crime News | पुण्यातील कुख्यात गुंड सचिन माने व त्याच्या 13 साथीदारांवर ‘मोक्का’, पोलीस आयुक्त रितेश कुमार यांची 16 वी कारवाई