बांधकाम कंत्राटदाराच्या खुनाचा ८ तासात छडा ; दोघांना अटक

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – बांधकाम मटेरियल स्पलायर्सचा शनिवारी रात्री धारदार शस्त्राने सपासप वार करू खून करण्यात आला होता. या प्रकरणात सांगली पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. घटनेनंतर अवघ्या आठ तासात पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या. ही घटना शनिवारी रात्री अकराच्या सुमारास संजयनगरमधील देवकुळे हॉस्पिटलच्या पिछाडीस सूर्यनगर कॉलनीत घडली होती.

सुभाष शिवाजी बुवा (वय 50, रा. निरंकार कॉलनी, संजयनगर, सांगली) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव असून पोलिसांनी इम्रान आणि रफिक शेख या दोघांना अटक केली आहे. हा खून पुर्ववैमनस्यातून केल्या असल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाले आहे. इम्रान आमि रफिक या दोघांनी सुभाष यांच्यावर धारदार हत्याराने १२ वार केले. यामध्ये गंभीर जखमी होऊन सुभाष बुवा यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे सांगील शहरात खळबळ उडाली होती. सुभाष बुवा यांच्या खुनाच्या गुन्ह्याचा छडा गुंडाविरोधी पथकाने लावला असून दोघांना अटक केली.

मृत सुभाष बुवा आणि शेख यांच्यामध्ये पूर्वी वाद झाले होते. या वादातून सुभाष बुवा यांच्या घरासमोर उभी असलेली गाडीची तोडफोड करण्यात आली होती. त्यामुळे शेख आणि बुवा यांच्यत वाद वाढला होता. हा प्रकरण मिटवण्यात आले होते. यानंतर काल बुवा यांना मोबाईलवर फोन करून घाराबाहेर बोलावले. बुवा यांना घरापासून काही अंतरावर नेऊन त्यांच्यावर धारदार शस्त्राने सपासप वार करून पसार झाले.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. रात्रीच शिताफीने तपास करून पोलिसांनी दोघांना अटक केली. दोघांनी खुनाची कबुली दिली असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

Loading...
You might also like