सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – Sangli Crime | कोरोनाच्या वाढत्या परिस्थितीमुळे राज्यातील सर्वच शाळेला टाळं लागलं होतं. दरम्यान सध्या कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आल्याने आजपासून (1 डिसेंबर) राज्यभर शाळा सुरु होणार आहेत. एकीकडे शाळेची घंटा वाजली. तर दुसरीकडे अत्यंत वाईट गोष्ट समोर आलीय. सांगली जिल्ह्यातील (Sangli Crime) एका शाळकरी मुलीचा दुर्दैवी अंत (Died) झाला आहे. मुलगी सायकलने रस्त्यावरून जात असताना तिला ट्रॅक्टरने चिरडलं आहे. अन्वेषा निर्भय विसपुते (Anvesha Nirbhaya Vispute) (वय, 12) असं त्या चिमुकलीचं नाव आहे. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी ट्रॅक्टरचालकाला अटक (Arrested) केली आहे.
याबाबत माहिती अशी की, मृत अन्वेषा ही काल (मंगळवारी) सकाळी 10 च्या सुमारास सायकलने जात होती. सांगली शहरातील हरिपूर (Haripur) रस्त्यावरून जात असताना, समोरून एक ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर येत होता. त्यामुळे अन्वेषा रस्त्याच्या कडेला असणाऱ्या भरावावर चढली. परंतु, यावेळी तिचा तोल जावून ती थेट उसाच्या ट्रॅक्टरखाली सापडली. या दुर्दैवी अपघातात अन्वेषाचा जागीच मृत्यू (Died) झाला. शाळा सुरु होतांच चिमुकलीचा मृत्यू झाल्यानं परिसरात खळबळ उडाली आहे. (Sangli Crime)
दरम्यान, सांगली शहर पोलिसांनी (Sangli City Police) घटनास्थळी येऊन घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. त्यानंतर चिमुकलीचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी ट्रॅक्टर चालक संभाजी बाबूराव भोसले (Sambhaji Baburao Bhosale) याच्या विरोधात गुन्हा (FIR) दाखल करून त्याला अटक (Arrested) केली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
Web Title :- Sangli Crime | 12 years old school girl died in road accident in sangli
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Supreme Court | ‘कोणतेही डॉक्टर आपल्या रूग्णाला जीवनाची खात्री देऊ शकत नाहीत’ – सर्वोच्च न्यायालय
Yamini Malhotra | ‘गुम हे किसीके प्यार मे’मधल्या ‘या’ अभिनेत्रीनं केलं टॉवेलवर फोटोशूट, फोटो व्हायरल