Sangli Crime | प्रेमप्रकरण? सांगलीतील 20 वर्षीय नर्सनं विषारी इंजेक्शन घेऊन केली आत्महत्या

सांगली न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  Sangli Crime | एका 20 वर्षीय नर्सने विषारी इंजेक्शन (Toxic Injection) घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना सांगली (Sangli Crime) जिल्ह्यातील मिरज (Miraj) या ठिकाणी घडली आहे. नर्सने प्रेमप्रकरणातून (Love Affair) आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. ही घटना 10 ऑगस्ट (मंगळवारी) घडली. आम्रपाली सतीश कांबळे (वय, 20 रा. रमामाता आंबेडकर कॉलनी, ता. मिरज) असं आत्महत्या केलेल्या नर्सचे नाव आहे. पोलिसांना (Police) घटनास्थळी सुसाइड नोट आढळली आहे. मात्र आत्महत्येचं (Suicide) कारण अद्याप अस्पष्ट आहे.

याबाबत माहिती अशी की, मृत आम्रपाली कांबळे (Amrapali Kambale) हिचे गेल्या काही दिवसांपासून आपल्या ओळखीच्या एका तरुणासोबत प्रेमसंबंध (Love Affair) सुरू होते.
याची माहिती आम्रपालीच्या कुटुंबीयांना मिळाली होती.
परंतु, कुटुंबीयांनी दोघांच्या लग्नाला होकार दिला होता.
असं असून देखील आम्रपालीने मंगळवारी विषारी इंजेक्शन (Toxic Injection) घेत आत्महत्या केली आहे. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
आम्रपाली ही एका खाजगी रुग्णालयात परिसचारिका म्हणून कार्यरत होती.
आम्रपालीनं विषारी इंजेक्शन घेतल्याची माहिती कुटुंबीयांना कळल्यानंतर, नातेवाईकांनी तात्काळ तिला उपचारासाठी सांगलीच्या शासकीय रुग्णालयात हलवलं.
परंतु, उपचारापूर्वीच तिचा मृत्यू (Death) झाला.

या दरम्यान, आम्रपाली हिने आत्महत्या का केली याचा अधिकृत कारणाचा खुलासा पोलिसांकडून (Police) अद्याप करण्यात आला नाही.
दरम्यान, पोलिसांना घटनास्थळी सुसाइड नोट (Suicide note) मिळाली आहे.
यामधून आत्महत्येचं नेमक्या कारणाचा खुलासा होण्याची शक्यता आहे.
याप्रकरणी पुढील तपास पोलीस करीत आहेत.

 

Web Title : Sangli Crime | 20 years old nurse commits suicide by toxic injection in miraj sangli love affair case

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Murder in Chakan | पत्नीच्या अनैतिक संबंधाच्या संशयावरून एकाचा खून, पत्नीच्याही खूनाचा प्रयत्न

Pune Crime | 16 वर्षीय मुलानं बापाचा केला खून, खेड तालुक्यातील खळबळजनक घटना

SBI मध्ये उघडा ‘हे’ विशेष खाते, जेव्हा शक्य होईल तेव्हा जमा करा पैसे; मिळेल चांगले व्याज