Sangli Crime | पतीपासून वेगळं राहणार्‍या 31 वर्षीय महिलेचा ‘घात’, कालव्याशेजारी मृतदेह आढळल्यानं प्रचंड खळबळ

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – Sangli Crime | एका महिलेची निर्घृण हत्या (Murder) करुन एका कालव्याठिकाणी त्या महिलेचा मृतदेह आढळून आल्याचे उघडकीस आले आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना सांगली जिल्ह्यातील (Sangli Crime) तासगाव येथील वासुबे गावात घडली आहे. ही हत्या अनैतिक संबंधातून झाली असावी असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेतले आहे.

 

याबाबत माहिती अशी, संबंधित 31 वर्षीय मृत (Died) महिला तासगाव येथील गणपती मंदिराच्या पाठीमागे भाड्याच्या खोलीत राहत होती. मृत महिला मूळची वासुबे येथील रहिवासी असून तिचा विवाह आष्टा येथील तरुणासोबत झाला होता. परंतु 6 वर्षांपूर्वी मृत महिला आपल्या पतीपासून विभक्त झाली होती. तेव्हापासून ती तासगाव येथील गणपती मंदिराच्या पाठीमागे भाड्याच्या खोलीत राहत होती. (Sangli Crime)

तर, मृत महिला सोमवारी (दि.29) दुपारी आपल्या राहत्या घरातून बाहेर गेली होती. मंगळवारी (दि.30) सकाळी तिचा मृतदेह वासुबे येथील आरफळ कालव्याशेजारी स्थानिक नागरिकांना आढळून आला. या धक्कादायक प्रकार समोर येताच नागरिकांनी तातडीने याची माहिती पोलिसांना दिली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत, मृतदेह ताब्यात घेतला. मृत महिलेची गळा आवळून हत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून तिच्या गळ्याभोवती व्रण आढळले आहेत. अशी माहिती पोलिसांनी दिली.

 

दरम्यान, या प्रकरणी तासगाव पोलिसांनी (Tasgaon Police) एका संशयित आरोपीला ताब्यात घेतलं आहे.
त्या आरोपीची सध्या चौकशी केली जातेय. महिलेची हत्या नेमकी कोणत्या कारणातून झाली?
याबाबत कोणतीही माहिती पोलिसांना मिळाली नाही. तर, याप्रकरणी अधिक तपास पोलिस करीत आहेत.

 

Web Title :- Sangli Crime | 31 years old divorced woman murdered by strangulation in sangli one suspect arrested sangli

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Debashish Chakraborty | राज्याला मिळाले नवे नवीन मुख्य सचिव, सिताराम कुंटेंनी सोपवला देबाशीष चक्रवर्तींकडे पदभार

Molestation Case | अ‍ॅसिड टाकून चेहरा खराब करेल, तुला सोडणार नाही ! भाजपच्या माजी नगरसेवकाचा अटकपूर्व जामिन अर्ज कोर्टाने फेटाळला

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 78 रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी