Sangli Crime | मित्रांनी लग्न मोडून केली तरुणाला बेदम मारहाण

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – सांगली जिल्ह्यातील विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका तरुणाचे तीन तरुण खोटी माहिती प्रसारित करून त्याचे ठरलेले लग्न मोडण्याचा प्रयत्न करत होते. याचा जाब विचारण्यास गेल्यावर या तरुणावर तिघांनी हल्ला (Sangli Crime) केला आहे. त्याच्या डोक्यात फरशी घालून त्याला बेदम मारहाण (Sangli Crime) केली आहे. याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात (Vishrambaug Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रणजीत नागराज मद्रासी (वय 27, रा. पसायदान कॉलनी दत्तनगर, सांगली) असे हल्ला झालेल्या तरुणाचे नाव आहे, तर विज्ञान आलदर (वय 28, रा. संजयनगर, सांगली), विनायक आलदर (32, रा. संजयनगर, सांगली) आणि प्रदीप सरगर (वय 28, दत्तनगर, सांगली) अशी तीन आरोपींची नावे आहेत. आरोपी आणि रणजीत हे मित्र आहेत. गेले काही महिने रणजीतचे लग्न जुळविण्याचे काम त्याचे कुटुंब करत आहेत. मात्र, ते जुळल्यावर मुलीच्या नातेवाइकांना रणजीतबद्दल तीनही आरोपी खोटी माहिती देत आहेत. त्यामुळे अनेकदा रणजीतचे जुळलेले लग्न मोडले आहे. (Sangli Crime)
हे तिघे मित्रच आपले लग्न जमू देत नाहीत, असा संशय रणजीतला होता.
यासाठी त्याने तिघांना जाब विचारला होता. तरीदेखील त्यांचे उद्योग सुरू होते.
पुन्हा एकदा या तिघांना जाब विचारण्यासाठी रणजीत गेला असता,
त्यांच्यात वाद झाले आणि त्याचे रूपांतर हाणामारीत झाले.
यातून तिघांनी मिळून रणजीतला बेदम मारहाण केली.
यावेळी त्यांनी रणजीतच्या डोक्यात फरशी टाकून त्याला रक्तबंबाळ केले.
रणजीतवर रुग्णालयात उपचार झाले आणि त्याने पोलिसांत फिर्याद दिली आहे.
Web Title :- Sangli Crime | a young man was beaten with a floor in sangli crime against three
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update