Sangli Crime | 3 महिन्याच्या ‘डॉबरमॅन’ कुत्र्याचे दोन्ही कान कापणाऱ्या डॉ. कोल्हेंवर FIR

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन –  तीन महिन्याच्या पाळीव कुत्र्याचे दोन्ही कान मुळातून कापून (cut off ears) त्याच्या नैसर्गिक ठेवणीत बदल केल्याप्रकरणी सांगलीतील (Sangli Crime) एका डॉक्टर विरोधात गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. डॉ. सुनिल कोल्हे Dr. Sunil Kolhe (रा. राजपूत कॉलनी, समृद्धीनगर) यांच्यावर सांगलीतील (Sangli Crime) संजयनगर पोलीस ठाण्यात (Sanjaynagar Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी प्राणीप्रेमी ओंकार सूर्यवंशी Omkar Suryavanshi (रा. सह्याद्रीनगर) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी डॉबरमॅन कुत्रा (Doberman dog) पाळला आहे.
दोन महिन्यापूर्वी सकाळच्या सुमारास तो कुत्रा घेऊन फिरायला जात होते.
तेव्हा मंगळवार बाजार येथील कोल्हे क्लिनिकचे डॉ. सुनिल कोल्हे यांची ओळख झाली.
डॉ. कोल्हे यांनी ओंकारला तुझ्या कुत्र्यासारखा डॉबरमॅन जातीचा पाळीव कुत्रा पाहिजे असल्याचे सांगितले.
त्यामुळे फिर्यादी यांनी यशवंतनगर येथील संजय तुपे यांच्याकडी एक पिल्लू 15 हजार रुपयांना विकत घेऊन कोल्हे यांना दिले.

दरम्यान, गुरुवारी ओंकार यांचा मित्र अथर्व शिंदे याने फोन करुन डॉ. कोल्ह याने पाळीव कुत्र्याचे कान क्लिनिकमध्ये कशाने तरी कापल्याचे सांगितले.
त्यामुळे ओंकार यांनी जाऊन पाहणी केली असता कुत्र्याचे दोन्ही कान मुळातून कापल्याचे दिसले.
ओंकार याने सांगलीतील (Sangli Crime) प्राणिमित्र अजित काशिद व कौस्तुभ पोळ यांना हा प्रकार सांगितला.
त्यानंतर ओंकार याने पोलीस ठाण्यात धाव घेत डॉ. कोल्हे विरोधात गुन्हा (Sangli Crime) दाखल केला आहे.
पुढील तपास पोलीस कर्मचारी असिफ सनदी (Asif Sanadi) करीत आहेत.

 

Web Title : Sangli Crime | Dr. sunil kolhe who cut off both ears of a 3-month-old ‘Doberman’ dog. FIR on Dr. Sunil Kolhe in sangli

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Sharad Pawar | शरद पवारांनी घेतली ‘सारथी’ची बैठक ! वडेट्टीवारांकडे असणारी जबाबदारी आता अजित पवारांकडे

Multibagger Stock | ‘या’ कंपनीच्या शेयरने 10 वर्षात दिला तब्बल 8000 टक्के रिटर्न; 10 हजार रुपये झाले 8 लाख

Ajit Pawar | ‘या’ कारणामुळं पुण्यात होतोय लसीच्या सुयांचा तुटवडा – अजित पवार (व्हिडीओ)