Sangli Crime | सांगलीतील बडया व्यावसायिकाची कोटयावधी रूपयांची फसवणूक, दुबईतील चौघांविरूध्द गुन्हा

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – Sangli Crime | सांगलीत फसवणुकीबाबत (Fraud) एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. द्राक्षे आणि डाळिंब निर्यात करणाऱ्या व्यापाऱ्यास दुबईतील कंपनीने (Company in Dubai) तब्बल 1 कोटी 36 लाखांचा (1 crore 36 lakhs) गंडा (Fraud) घातल्याचं समोर आलं आहे. याप्रकरणी सांगलीतील (Sangli Crime) विश्रामबाग पोलिस स्टेशनमध्ये (Vishrambag Police Station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. दुबईतील कंपनीच्या 2 मालकांसह मुंबईतील दोघा कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत अधिक माहितीनुसार, पौर्णिमा पाटील (Pournima Patil) (रा. उत्तर शिवाजी नगर.सांगली) यांची पीव्हीआयपी एक्सपोर्ट एलएलपी सांगली (PVIP Export LLP Sangli) नावाने आयात-निर्यात करणारी कंपनी आहे. ते द्राक्षे, डाळिंब, नारळ, तांदुळ मालाची खरेदी करून निर्यात करतात. 2019 साली दुबईतील ओपीसी फुडस्टफ कंपनीचा पर्चेस ऑफिसर माजीद जलाल (Majid Jalal) याने मोबाइलवरून संपर्क साधून मालाची चौकशी केली. त्यावेळी पौर्णिमा यांनी कंपनीविषयी सर्व माहिती दिली. मुंबई परिसरात दिलीप जोशी (Dilip Joshi) हा काम पाहत असल्याची माहिती माजीद जलाल यांनी दिली. त्यानंतर पौर्णिमा यांनी पतीसह डिसेंबर 2019 साली जोशी याची मुंबईत भेट घेतली. त्यावेळी संशयित मंगेश गांगुर्डे (Mangesh Gangurde) हा भारतातील काम पाहत असल्याने त्यावेळी ओळख झाली होती.

BPCL Recruitment 2021 | भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये 87 जागांसाठी भरती, जाणून घ्या

दरम्यान, फिर्यादी हे मजीद जलाल आणि कंपनीला भेटण्यासाठी दुबईला रवाना झाले.
त्यावेळी कंपनीचा मालक कंपनीचा मालक मुहम्मद फारूक (Owner Muhammad Farooq), बद्र अहमद हुसेन (Badr Ahmed Hussein) यांची ओळख झाली.
माल निर्यातीसाठी 50 टक्के रक्कम आगाऊ व मालाचे कंटेनर ‘युएई’मध्ये मिळाल्याने बाकी रक्कम देण्याचा व्यवहार ठरला.
त्यानुसार जानेवारी 2021 साली ऑर्डर मिळाली.
द्राक्षाचे 4 आणि डाळिंबाचे 3 असे 7 कंटेनर निर्यात केले.
ज्याची किंमत 1 कोटी 57 लाख इतकी होते.
त्यावेळी 30 टक्के रक्कम फिर्यादी यांना देण्यात आली.

दरम्यान, बाकी रक्कमेसाठी जलाल याच्याशी संपर्क साधला. त्यावेळी त्यांनी स्पष्ट असे काही सांगितले नाही.
मात्र फिर्यादी यांना फसवणुक झाल्याचे समजताच त्यांनी थेट पोलिस ठाणे गाठले.
यानुसार दुबईतील ओपीसी फुडस्टफ ट्रेडिंग एलएलसी कंपनीचा मालक मुहम्मद फारूक, बद्र अहमद जुमा हुसेन, दिलीप जोशी, व्यवस्थापक माजीद जलाल आणि मंगेश गांगुर्डे याच्यांवर गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

हे देखील वाचा

Amruta Fadnavis | ‘मी एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून बोलते, विचार मांडते’; अमृता फडणवीस यांनी उलगडलं त्यांचं जगण्याचं आणि कामाचं पॅशन

Pune Crime | हवेलीच्या तहसीलदार तृप्ती कोलते यांना बळजबरीने ‘लाच’ देण्याचा प्रकार, जाणून घ्या प्रकरण

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Sangli Crime | dubai based company cheated with sangli grapes pomegranate businessman case registered

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update