Sangli Crime | तपासासाठी गेलेल्या पोलीस पथकावर हल्ला, जिल्हा सत्र न्यायालयाकडून 5 महिलांना सक्तमजुरी

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – Sangli Crime | दरोड्याच्या (Robbery) गुन्ह्यासंदर्भात तपासासाठी गेलेल्या पोलिसांच्या पथकावर हल्ला (Attack Police Squad) केल्याची घटना सांगली जिल्ह्यात (Sangli Crime) घडली होती. या प्रकरणी जिल्हा सत्र न्यायाधीश एस. पी. पोळ (District Sessions Judge S. P. Pol) यांनी मिरज तालुक्यातील वड्डी गावातील पाच महिलांना सक्तमजुरीची (Hard Labor) शिक्षा सुनावली आहे. सरकार पक्षाच्या वतीने अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील मेघा प्रवीण पाटील (Additional District Government Advocate Megha Praveen Patil) यांनी काम पाहिले.

 

रेखा जगेश उर्फ कलीयुग भोसले (Rekha Jagesh alias Kaliyug Bhosale), छायाक्का सुनील भोसले (Chhayakka Sunil Bhosale), जानकी गौडा भोसले (Janaki Gowda Bhosale), मनीषा पाटील-भोसले (Manisha Patil-Bhosale) व छोटा उर्फ छाया ऋषिकेश पवार Chhota alias Rishikesh Pawar (सर्व रा. वड्डी, ता. मिरज) अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत.

 

काय आहे प्रकरण ?

मिरज तालुक्यातील मल्लेवाडी येथे दरोडा पडला होता. 11 जानेवारी 2019 रोजी या दरोड्याच्या तपासासाठी मिरज ग्रामीण पोलिसांचे पथक (Miraj Rural Police Squad) वड्डी गावी गेले होते. त्यावेळी या महिलांनी जमाव जमवून पोलीस पथकावर हल्ला केला होता. यामध्ये किशोर कदम (Kishor Kadam) व विनोद कदम (Vinod Kadam) हे दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले होते. याप्रकरणी किशोर कदम यांनी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात (Miraj Rural Police Station) फिर्याद दिली होती.

 

या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक डी. पी. तळपे (API D. P Talpe) यांनी करुन पाच महिलांविरुद्ध आरोपपत्र (Charge Sheet) दाखल केले.
न्यायालयाने साक्षी पुराव्यावरुन या पाच महिलांना दोषी ठरवून शिक्षा सुनावली.
सरकार पक्षाला मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार एस. व्ही. साळुंखे (Police Constable S. V. Salunkhe) यांनी मदत केली.

 

Web Title :- Sangli Crime | Five women sentenced for attacking police squad

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा