Sangli Crime | सांगली जिल्ह्यात ‘सैराट’ ! प्रेमविवाह केला म्हणून तरुणावर प्राणघातक हल्ला; परिसरात खळबळ

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – Sangli Crime | सांगली जिल्ह्यात (Sangli Crime) ‘सैराट’ चित्रपटासारखी भयानक आणि काळजाला थरकाप करणारी घटना घडली आहे. सांगली जिल्हयातील मिरज (Miraj) येथे प्रेम विवाह (Love Marriage) केला म्हणून एका तरुणावर त्याच्या सासरच्यांनी प्राणघातक हल्ला (Assault) केला आहे. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी (Seriously injured) झाला आहे. मात्र, सुदैवाने तो बचावला आहे. योगेश लवाटे (Yogesh Lavate) असं त्या तरूणाचे नाव आहे.

 

याबाबत माहिती अशी की, योगेशने दीड महिन्यांपूर्वी वाळवा तालुक्यातील भडकंबे (Bhadkambe) येथील तरुणीसोबत प्रेमविवाह केला होता. तरुणाचं त्याच्या पत्नीवर खूप प्रेम होते. पण तिच्या कुटुंबियांचा लग्नाला विरोध होता. त्यामुळे त्यांनी कुटुंबियांना न सांगता प्रेम विवाह उरकला. पण या प्रेमविवाहाचा मुलीच्या कुटुबियांच्या मनात राग होता. त्यांना मुलीपेक्षा प्रतिष्ठा जास्त महत्त्वाची वाटत होती. समाजात आपली अवहेलना झाली या भावनेतून त्यांना बदला घ्यायचा होता. (Sangli Crime)

 

या दरम्यान दोन दिवसांपूर्वी योगेश लवाटे (Yogesh Lavate) आणि मुलीचे आई-वडील यांच्यामध्ये मोठा वाद झाला होता. हा वाद थेट मिरज शहर पोलीस ठाण्यापर्यंत (Miraj City Police Station) पोहोचला होता. संबंधित घटनेनंतर योगेश हा गुरुवारी (3 फेब्रुवारी) रोजी रात्रीच्या सुमारास घरी निघाला असता दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात योगेश गंभीर जखमी झाला आहे. यानंतर त्याला शासकीय रुग्णालयात दाखल केले गेले. त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहे. या घटनेमुळे त्याचे कुटुंबीय खचले आहे.

दरम्यान, या घटनेनंतर पोलिसांनी (Miraj City Police Station) तातडीने घटनास्थळी दाखल होऊन तपास केला.
यानंतर पोलिसांनी तपास करत दोन संशयितांना ताब्यात घेतलं आहे. त्यानंतर गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी दोघा आरोपींची सध्या चौकशी सुरू आहे. या प्रकरणी अधिक तपास पोलिस करीत आहेत.

 

Web Title :- Sangli Crime | girl relatives attacked on her husband after love marriage in miraj sangli

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Koregaon Bhima Case | कोरेगाव भीमा दंगल प्रकरणासंदर्भात विश्वास नांगरे पाटील यांना चौकशीसाठी बोलवणार? पुराव्याचे प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आयोगाचे आदेश

 

Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 13,840 नवे रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

 

Pune Corporation Employees | पुणे महापालिकेतील समाविष्ट 23 गावांतील 46 ‘बोगस’ कर्मचारी ‘बडतर्फ’; सर्वाधिक बोगस भरती बावधन बु. आणि नर्‍हे ग्राम पंचायतीमध्ये झाल्याचे उघड