Sangli Crime | हस्तीदंतांची तस्करी करणारी टोळी गजाआड, तब्बल 20 लाखाचे दोन हस्तीदंत जप्त

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन – Sangli Crime | हत्तीचे हस्तीदंत तस्करी (Trafficking in Elephant Ivory) करणारी टोळी गजाआड करण्यात आली आहे. तब्बल 20 लाखाचे दोन हस्तीदंत पोलिसांनी जप्त केले आहेत. सांगलीच्या (Sangli Crime) कवठेमहांकाळ पोलिसांनी (Kavthemahankal Police) ही कारवाई केली आहे. या तस्करी प्रकरणी चार जणांना अटक (Arrest) करण्यात आली आहे.

 

 

कवठेमहांकाळ पोलिसांना आपल्या खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, खरशिंग ते दंडोबा डोंगराकडे जाणाऱ्या रस्त्यालगत गिरनार तपोवन मठाच्या (Girnari Tapovan Math) येथे झाडाझुडपात हत्तीचे हस्तदंत घेऊन थांबलेले आढळून आले. कवठेमहांकाळ पोलिसांनी सापळा रचून या चार आरोपींना अटक केली आहे. (Sangli Crime)

कोल्हापूर (Kolhapur) येथून हस्ती दंत घेऊन येणारे दोन आरोपी आणि सांगली मधील खरेदीदार दोन आरोपी असे चार आरोपींना पोलिसांनी अटक करून त्याच्यावर वन्य जीव कायद्यानुसार (According to the Wildlife Act) गुन्हा दाखल केला आहे.
सांगली, कोल्हापूर, आणि कर्नाटकमध्ये तपास करून आणखी कारवाई करण्यात येणार असल्याचे
पोलीस उपअधीक्षक मनीषा डुबले (DySP Manisha Duble) यांनी सांगितले. आरोपी राहुल रायकर, बालाजी बनसोडे,
हे दोघे कोल्हापुर मधील तर कासीम काझी, मिरज तर हणमंत वाघमोडे हा कर्नाटक मधील रहिवासी आहे.

 

Web Title :- Sangli Crime | kavthemahankal police arrested a gang of four
who smuggled ivory ivory worth twenty lakhs seized

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा