Sangli Crime | सहलीच्या आमिषाने इंडिया हॉलीडेज टूर कंपनीने साडेपाच लाखांची केली फसवणूक; पुण्यातील एकावर FIR

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – Sangli Crime | टूर कंपनीच्या माध्यमातून केदारनाथ (Kedarnath), बद्रिनाथ (Badrinath) येथे घेऊन जाण्याचे आमिष दाखवून 5 लाख 29 हजार 400 रुपयांची फसवणूक (Fraud) केल्याचा प्रकार (Sangli Crime) उघडकीस आला आहे. याप्रकरणी पुण्यातील एकावर गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत धनश्री रामचंद्र कुंभार Dhanashree Ramachandra Kumbhar (रा. भोसे ता. मिरज) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात (Vishram Bagh Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी परेश सुभाज गुजर Paresh Subhaj Gujar (रा. गंज पेठ, पुणे – Ganjpeth Pune) याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार 17 जून ते 30 सप्टेंबर या कालावधीत घडला आहे. (Sangli Crime)

 

आरोपी गुजर याची इंडिया हॉलीडेज चारधाम टूर (India Holidays Chardham Tour) या नावाने पुणे येथे कार्यालय आहे.
या टूर कंपनीच्या माध्यमातून केदारनाथ व बद्रिनाथ येथे जाण्यासाठी फिर्यादी कुंभार यांच्यासह 18 महिलांनी प्रत्येकी 32 हजार रुपये भरले होते.
ऑनलाइन पद्धतीने ही रक्कम गुजर याच्या मोबाइलवर पाठवण्यात आली. गुजर याला 5 लाख 29 हजार 400 रुपये देऊनही त्याने ट्रीपचे आयोजन केले नाही.
फिर्यादी यांनी याबाबत पाठपुरावा करून वारंवार विचारणा करून च्याकडून प्रतिसाद मिळत नसल्याने फसवणूक झाल्याचे फिर्यादी यांच्या लक्षात आले.
त्यांनी पोलिसांकडे याबाबत तक्रार केली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

 

Web Title :- Sangli Crime | kedarnath badrinath trip bait of five and a half lakhs the suspect is from pune

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Chandrakant Patil | ‘शाळा सुरू करण्यासाठी फुले-शाहू-आंबेडकरांनी भीक मागितली’; चंद्रकांत पाटलांचे वादग्रस्त विधान

MNS Leader Vasant More | “जिथे फुले वेचली तिथे काटे …”; वसंत मोरेंचा शहर कार्यालयात येण्यास नकार

SSC HSC Board Exams | दहावी, बारावीच्या परीक्षार्थींनो सावधान; बोर्डाने बदलले हे दोन नियम