Sangli Crime | सोन्याचे दागिने पळवणाऱ्या महिलांच्या टोळीचा पर्दाफाश; सांगली गुन्हे शाखेची कारवाई

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – Sangli Crime | गर्दीचा फायदा उठवत चोरी (Theft) करणा-या महिलांच्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. सांगली (Sangli Crime) एसटी स्टॅन्ड परिसरात ही घटना घडली. ही कारवाई सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (LCB) केली आहे. चोरी करणा-या कोल्हापूर येथील एका महिलेला अटक (Arrested) करण्यात आली आहे. त्या महिलेकडून 1 लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहे.

मागील काही दिवसांपासून सांगली येथील एसटी स्टॅन्ड परिसरात पर्स आणि पाकीट चोरी (Theft) करण्याचे प्रकार अधिक वाढले होते. याबाबत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून तपास सुरू असताना शहरातल्या शिवाजी मंडई या ठिकाणी सापळा लावला असता, एक महिला संशयित आढळून आली. तिला ताब्यात घेऊन त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता, त्यानंतर त्या संशयित महिलेकडून 1 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले. या महिलेकडून 2 चोरीचे गुन्हे देखील उघडकीस (Sangli Crime) आले आहेत.

दरम्यान, गर्दीचा फायदा घेऊन एसटीमध्ये चढणाऱ्या प्रवाशांचे सांगली, जयसिंगपूर आणि हातकणंगले एसटी स्टॅन्ड परिसरात आपल्या ३ महिला साथीदारांच्या समवेत चोरी करत असल्याची कबुली दिली आहे. आणखी कोण या टोळीमध्ये सामील आहे का याचा पुढील तपास पोलिस (Sangli Crime) करीत आहेत.

हे देखील वाचा

Petrol Diesel Price Pune | इंधनाचा भडका सलग तिसर्‍या दिवशी कायमच; महिन्याभरात पेट्रोलमध्ये 6.79 रुपयांची वाढ

River Improvement Project | ‘नदी सुधार प्रकल्पाच्या नावाखाली नदी पात्रात भर घालू नका, अन्यथा…’ जलसंपदा खात्याचा पुणे मनपाला स्पष्ट इशारा

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Sangli Crime | lady gang theft gold ornaments at bus stand arrested in sangli

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update