Sangli Crime | धडक करावाई ! नशेबाज तरुणांना नशेच्या गोळ्यांचा पुरवठा करणाऱ्या मेडिकलवर पोलिसांचा छापा

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – Sangli Crime | सांगली येथील मिरज तालुक्यातील महात्मा गांधी चौकी पोलीस ठाण्याच्या (Miraj Mahatma Gandhi Chowki Police Station) हद्दीतील एका मेडिकलवर पोलिसांनी धडक कारवाई (Action) केली आहे. मेडिकल दुकानदार नशेबाज तरुणांना नशेच्या गोळ्यांचा (Intoxication pills) पुरवठा करत असल्याचे आढळून आल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. तेथील मिरज रेल्वे स्टेशन नजीक आणि मिरज शहर स्टँड परिसरात नशेच्या गोळ्याचे सेवन करून नशेबाज तरुणांचा अनेक दिवस धुडगुस सुरुय. अनेक तरुण नशा करुन परिसरातील नागरीकांना मागील तीन माहिन्यापासुन त्रास देताहेत. यावरुन आता पोलीसांनी कारवाईचा (Sangli Crime) बडगा उगारला आहे.

महात्मा गांधी चौकीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस (API Raviraj Phadnis) यांनी डॉक्टरांच्या चिठ्ठी शिवाय मेडिकलमधील गोळ्या देऊ नये असे आवाहन केले होते. मात्र, तरी देखील मेडिकल दुकानदार नशेबाज तरुणांना नशेच्या गोळ्यांचा पुरवठा करत असल्याचे आढळून आले. यावरुन पोलीसांनी ही कारवाई केली आहे. पोलीसांनी एका रेकॉर्डवरील गुन्हेगाराला ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या खिशात नशेच्या गोळ्या आढळुन आल्या. याबाबत चौकशी केली असता सांगली मिरज रोडवरील आयुष मेडिकलमधून त्याने गोळ्या घेतल्याचे म्हटले. त्याला पुन्हा आयुष मेडिकलमधून गोळ्या आणण्यासाठी सांगितले आणि मेडिकल बाहेर पोलिसांनी ट्रॅप लावला. त्यावेळी त्याने डॉक्टरांच्या चिठ्ठी शिवाय मेडिकलमध्ये जाऊन 40 नशेच्या गोळ्या आणल्या. त्यावेळी पोलीसांनी मेडिकल दुकानदारास रंगेहात पकडले आहे.

पोलिसांनी औषध विक्रेत्यांना चिठ्ठी विना औषध देऊ नये असा इशाराही दिला होता. याबाबत पोलिसांना हा
अंदाज होता मेडिकलमध्ये असे औषध दिले जात असणार. सध्या याबाबत पोलिसांनी अन्न आणि औषध
विभागाला कळवले असून एफडीएने संबंधित मेडिकलला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. मेडिकल
दुकानदाराने डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय गोळ्या दिल्याने मेडिकल दुकानदारास ताब्यात घेण्यात आले आहे.

हे देखील वाचा

Pune Crime Branch Police | पत्नीला भेटायला पुण्यात आला अन् गुन्हे शाखेच्या जाळ्यात आडकला, सराईत वाहन चोराकडून 18 दुचाकी जप्त

Medha Kulkarni | अव्दितीय अन् अलौकिक ! मेधा कुलकर्णींनी घेतली पंतप्रधानांची भेट, PM मोदींना राखी बांधुन केली ‘ही’ विनंती

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Sangli Crime | miraj police raid on medical store who was selling intoxication pills without prescription

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update