Sangli Crime | कोडोली येथील माय-लेकीची वारणा नदीत उडी टाकून आत्महत्या

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन –  Sangli Crime | दोघी माय-लेकींनी वारणा नदीत उडी टाकून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना (Sangli Crime) समोर आली आहे. पन्हाळा तालुक्यातील कोडोली येथील आईने मुलीसह ऐतवडे खुर्द (ता. वाळवा) येथील वारणा नदीत उडी टाकली आहे. नदीत उडी टाकून अखेर दोघांचं जीवन संपवलं आहे. ही घटना (बुधवारी) 25 ऑगस्ट रोजी घडली आहे. रेश्मा अमोल  पारगावकर (वय, 36), ऋदा अमोल पारगावकर (वय.13, दोघी रा. कोडोली, ता. पन्हाळा) अशी आत्महत्या केलेल्यांची नावे आहेत. याबाबत फिर्याद पोलिस पाटील मोहन चांदणे यांनी कुरळप पोलिस ठाण्यात (Kurlap Police Station) दिलीय.

याबाबत अधिक माहिती अशी, रेश्मा पारगावकर (Reshma Pargaonkar) एका दवाखान्यात परिचारिका म्हणून काम करीत होत्या. त्यांना मूलबाळ नव्हते.
आई आणि पती यांचा मृत्यू झाल्याने रेश्मा यांनी 4 दिवसांची मुलगी दत्तक घेतली होती.
ती मुलगी 4 महिन्यांची झाल्यानंतर मतिमंद असल्याचे लक्षात आले.
तरी देखील त्यांनी तिचा संभाळ केला. मात्र, सध्या या मुलीचा सांभाळ करणे रेश्माला अवघड झाले होते.
त्या दोघी कोडोली (Kodoli) येथे भाड्याने राहत होत्या.
रेश्मा कामावर गेल्यास मुलीचा सांभाळ करण्यासाठी घरी कुणीच नव्हते.
कुणाचा आधार नसल्याने रेश्मा निराश होत्या. या निराशेतून रेश्मा यांनी या 13 वर्षाच्या मुलीसह नदीत उडी टाकून आत्महत्या केलीय. यावरून परिसरात हळहळ व्यक्त होते.

 

दरम्यान, (बुधवारी) 25 ऑगस्ट रोजी दुपारी 12 च्या दरम्यान एका महिलेचा मृतदेह ऐतवडे खुर्दच्या माळी मळ्यातील नदीपात्रात तेथील स्थानिकांना दिसला.
यांनतर पोलिसांनी कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील रेस्क्यू पथकाला बोलावले.
या साहाय्याने दुपारी 4 वाजता मुलीचाही मृतदेह बाहेर काढण्यात आला.
दरम्यान, पोलिस उपअधिक्षक कृष्णात पिंगळे, एपीआय दीपक जाधव यांनी घटनास्थळी पाहणी केली.
कुरळप पोलिस ठाण्याचे (Kurlap Police Station) गजानन पोतदार यांनी पंचनामा केला.
दोन्ही मृतदेहांचे शवविच्छेदन करून ते नातेवाईकांच्या ताब्यात दिले.
कोडोली पोलीस देखील घटनास्थळी उपस्थित होते.

 

Web Title : Sangli Crime | mother and daughter in Kodoli committed suicide by jumping into the Warna River

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Ramdas Athavale | रामदास आठवलेंसह रिपब्लिकन पक्षाचे नेते नारायण राणेंच्या भेटीला, दिला हा महत्वाचा सल्ला

Tax Benefits on Home Loan | फायद्याची गोष्ट ! होम लोनवर कशाप्रकारचे मिळतात TAX बेनिफिट्स, जाणून घ्या सविस्तर

FIR on Police Inspector | पोलिसाची सटकली ! पान द्यायला झाला उशीर, रिक्षाचालकाला बेदम मारहाण, पोलीस निरीक्षकासह तिघांवर FIR