सांगलीत 5 देशी पिस्तूल, 15 काडतुसे जप्त, दोघांना अटक

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – जिल्ह्यातील आटपाडी-नाझरे मार्गावर पिस्तुलांची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून 5 देशी बनावटीची पिस्तूल, 15 काडतुसे, 5 मेगेझीन, एक कार असा साडेनऊ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी पत्रकार परिषदेत दिली.

देवा उर्फ देवेंद्र तानाजी सांगवे (वय 24, रा. थेरगाव, चिंचवड), बाला उर्फ बालाजी गणपत आदाटे (वय 22, रा. आटपाडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात घातक शस्त्रांची तस्करी करणार्यावर कारवाई करण्याचे आदेश अधीक्षक शर्मा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला दिले आहेत. त्यानुसार शाखेच्या प्रभारी अधिकाऱ्यांनी एक विशेष पथक तयार केले आहे. आटपाडी-नाझरे रस्त्यावर दोन युवक पिस्तूल घेऊन येणार असल्याची माहिती पथकाला मिळाली होती.

संशयित एका कारमधून येणार असून ते शस्त्रे विक्रीसाठी संगोल्याला जाणार असल्याचीही माहिती पथकाला मिळाली होती. त्यानुसार पथकाने सापळा लावला होता. दोघेही संशयित तेथे आल्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या कारची झडती घेतल्यानंतर एका पिशवीत 5 देशी बनावटीची पिस्तूल, 15 काडतुसे, 5 मॅगेझिन सापडली. त्यांना तातडीने अटक करण्यात आली. त्यांची कार (एमएच 14 एफसी 0069) जप्त करण्यात आली. त्यांच्याविरुद्ध आटपाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निरीक्षक पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रवीण शिंदे, निलेश कदम, विशाल भिसे, सागर लवटे, बिरोबा नरळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Visit : Policenama.com 

शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी
बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या