Sangli Crime News | मिरजमध्ये बँक कर्मचाऱ्याकडून ग्राहकांना 90 लाखांचा गंडा

मिरज : पोलीसनामा ऑनलाईन – Sangli Crime News | सांगली जिल्ह्यातील अ‍ॅक्सिस बँकेच्या मिरज शाखेतील 10 ग्राहकांना सुमारे 90 लाख 61 हजार 128 रुपयांचा गंडा घालण्यात आल्याची घटना रविवारी घडली आहे. याप्रकरणी बँकेचा कर्मचारी तोहिद अमीर रिकमसलत (वय 27, रा. मिरज) याच्याविरूद्ध मिरज शहर पोलिस ठाण्यात ग्राहकांची फसवणूक (Cheating Case) केल्याप्रकरणी गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. (Sangli Crime News)

10 जणांची करण्यात आली फसवणूक
यामध्ये रिसाज दादापीर कोतवाल (मिरज) अमिना नजीर शेख (गुरुवार पेठ, मिरज), अशोक जिनगोंडा पाटील (मानमोडी रोड, कळंबी), समीर वजीर जमादार (मिरज), वाजिदा शमशुद्दीन कोतवाल, आशिया शमशुद्दीन चाऊस (मिरज), रमेश जमराम सेवानी (मंगळवार पेठ, मिरज), हुसेन इमाम बेपारी (वखारभाग, मिरज), गणी युसूफ गोदड (टाकळी रोड, मिरज), मेहबूब अल्ल्लाबक्ष मुलाणी (मिरज) अशी फसवणूक करण्यात आलेल्या ग्राहकांची नावे आहेत. (Sangli Crime News)

या फसवणुकीप्रकरणी बँकेचे साजिद बाबालाल पटेल (वय 38, रा. विजयनगर, सांगली) यांनी फिर्याद दाखल केली आहे.
आरोपी तोहिद रिकमसलत याच्याकडे बँकेच्या ग्राहकांना भेटून सेव्हिंग व करंट खाते उघडण्याची जबाबदारी देण्यात आली होती.
यानंतर रिकमसलत याने ग्राहकांचा विश्वास संपादन करून स्वत:च्या आर्थिक फायद्याकरीता ग्राहकांकडून काही रक्कम घेतली.
तसेच ग्राहकांच्या खात्यावरूनदेखील त्याने काही रक्कम काढून घेतली. रिकमसलत याने एप्रिल 2019 ते दि. 16 फेब्रुवारी 2023 या कालावधीत त्याने ग्राहकांची 90 लाख 61 हजार 128 रुपयांची फसवणूक केली.
यानंतर ग्राहकांच्या तक्रारीनंतर बँकेने रिकमसलत याची चौकशी केली असता तो त्यामध्ये दोषी आढळून आला.
त्यामुळे बँकेने त्याच्या विरोधात फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे.

Web Title :- Sangli Crime News | 90 lakhs extortion from bank employee to customers in Miraj

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Budget Session 2023 | अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी खडाजंगी, देवेंद्र फडणवीसांनी भास्कर जाधवांना सुनावलं, म्हणाले- ‘आम्ही हे खपवून घेणार नाही, हे…’

Pune Crime News | झोन-2 च्या पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील यांच्याकडून शहरातील 2 सराईत गुन्हेगार तडीपार

MNS Chief Raj Thackeray | ‘राज ठाकरेंनी वाचन वाढवावं’ म्हणाऱ्यांना राज ठाकरेंचा टोला, म्हणाले – ‘मी जेव्हा चार दुऱ्या टाकतो, तेव्हे ते…’