Sangli Crime News | पुतण्याकडून चुलत्याचा खून, आकस्मित मृत्यूचा बनाव उघडकीस

Bharati Lad Passes Away | Patangrao Kadam's daughter Bharati Lad passes away; Vishwajit Kadam posted the photo and said..

सांगली : Sangli Crime News | किरकोळ वादातून रागाच्या भरात चुलत्याच्या डोक्यात चिनी मातीची भरणी घालून खून केल्याची घटना कवठेमहांकाळ (ता- तासगाव) येथे उघडकीस आली आहे. मिरासो बांबू तांबोळी (वय-६२) असे खून झालेल्या चुलत्याचे नाव आहे. तर सुबहान उस्मानगणी तांबोळी (वय-२३) असे आरोपी पुतण्याचे नाव आहे.

खुनाच्या घटनेनंतर जिन्यावरून चढताना चिनी मातीची भरणी डोक्यात पडून आकस्मिक मृत्यू झाल्याचा बनाव केला होता. मात्र वैद्यकीय अहवाल आणि पोलिसांनी केलेल्या तपासानंतर हा आकस्मिक मृत्यू नसून खून झाल्याचे उघडकीस आले. त्यानंतर संशयित आरोपीला अटक करून तासगाव पोलिसांनी फिर्याद दाखल केली आहे.

अधिक माहितीनुसार, २४ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता मिरासो बाबू तांबोळी हे चिनी मातीची भरणी डोक्यावर घेऊन जिन्यावर चढत असताना मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर त्यांना तासगाव येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले होते. यावेळी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती.

त्याठिकाणी शवविच्छेदन करण्यात आले होते. शेवटचे दोन अहवाल आल्यानंतर हा आकस्मिक मृत्यू नसल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर पोलीस उप अधीक्षक आणि तासगाव पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांच्या मार्गदर्शनानुसार पोलीस उपनिरीक्षक राजू अन्नछत्रे यांनी तपास केला असता किरकोळ वादातून रागाच्या भरात पुतण्याने चुलत्याचा खून केल्याची बाब उघडकीस आली.

Total
0
Shares
Related Posts