Sangli Crime News | पोराला भूतबाधा झाल्याने तो घरातल्यांना त्रास देतो ! बापानेच छाटले मुलाचे शिर, सांगोल्यातील तलावात मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलिसांनी केली कारवाई

सांगली : Sangli Crime News | पोराला भूतबाधा झाल्याने तो घरातल्यांना त्रास देत असल्याच्या कारणावरून बापानेच मुलाचे शिर कापून त्याचा खून केला. दि. 15 जुलैच्या दरम्यान ही घटना घडली. विजय विलास सरगर (वय 21, रा. कवलापूर) असे मृताचे नाव आहे. विजयचा खून केल्यानंतर एका पोत्यात मृतदेह भरून त्याला मोठा दगड बांधून सांगोला येथील बंद्धेहाळ तलावात टाकण्यात आला होता. याबाबत सांगोला पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. याप्रकरणी सांगली ग्रामीण पोलिस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक निरीक्षक प्रशांत निशाणदार (Assistant Police Inspector Prashant Nishandar) यांनी संशयित बापासह मृताच्या आतेभावास अटक (Sangli Crime News) केली आहे.

Vishwajeet Kadam | कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांच्या ताफ्यातील गाडीला अपघात, 2 पोलिस कर्मचारी गंभीर जखमी

विलास बाबू सरगर (वय 45, रा. कवलापूर), उत्तम मदने (वय 28, रा. कोळे, ता. सांगोला) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. सहाय्यक निरीक्षक निशाणदार सोमवारी महापूराच्या पार्श्वभूमीवर कवलापूर येथील बेपत्ता व्यक्तींची माहिती घेत होते. त्यावेळी विजय हा गेल्या कित्येक दिवसांपासून बेपत्ता असल्याची माहिती त्यांना मिळाली. याबाबत त्यांनी त्याचे वडील विलास सरगर यांच्याकडे चौकशी केल्यानंतर त्याने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. कसून चौकशी केल्यानंतर त्याने मुलगा विजय याचा तलवारीने शिर कापून खून केल्याची कबुली दिली. यामध्ये त्याचा भाचा उत्तम मदने यानेही मदत केल्याचीही कबुली त्याने दिली.

sangli crime news | father kill son dead body was found in a lake in Sangola two arrest

मुलगा विजय घरातील आई, वडील, बहिणींना वारंवार त्रास देत होता. त्याच्या सततच्या त्रासाला कंटाळूनच त्याचा खून केला. सुरुवातील त्याला गोड बोलून जुनोनी (ता. कवठेमहांकाळ) येथे नेले. तेथे घेतलेल्या एका भाड्याच्या घरातील मोरीत तलवारीने त्याचे शिर कापले. त्यानंतर पूर्ण रक्त वाहू दिल्यानंतर त्याचा मृतदेह पोत्यात भरला. त्या पोत्याला मोठा दगड बांधून ते सांगोला तालुक्यातील बंद्धेहाळ तलावात टाकल्याचीही त्याने कबुली दिली. त्यानंतर पवार याला ताब्यात घेण्यात आले. तर मदनेला मुंबईतून ताब्यात घेण्यात आले. दोघांनाही सांगोला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Corona Cases in Pune | दिलासादायक ! पुण्यात उपचाराधीन रुग्णसंख्येत प्रचंड घट; शहरात 916 जणांवर विविध रुग्णालयात उपचार

पोलिस अधीक्षक दीक्षित गेडाम (Superintendent of Police Dixit Gedam) यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक प्रशांत निशाणदार ((Assistant Police Inspector Prashant Nishandar)), बाळकृष्ण गायकवाड, रमेश कोळी, महेश जाधव, आकाश गायकवाड आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
चौकट

भूतबाधेच्या शंकेतून कृत्य

मृत विजय घरातल्यांना वारंवार त्रास देत होता. तसेच त्याला भूतबाधा झाल्याचा संशयही वडील
विलास सरगर यांना होता. विजय अनेकदा कित्येक किलो कच्चे मांस खात होता. त्यामुळे विजयला
भूतबाधा झाल्याची खात्रीच घरच्यांना झाली होती. त्यातूनच वडिलांनीच त्याचा जीव घेतल्याची चर्चा
कवलापूर परिसरात होती.

शिर मिळालेच नाही

संशयितांनी तलवारीने शिर कापून विजयचा खून केला. मृतदेहासोबतच शिर बंद्धेहाळ तलावात
टाकल्याची त्यांनी कबुली दिली आहे. मात्र पोलिसांनी शोध घेऊनही अजून शिर मिळालेच नाही.
त्यामुळे संशयित खोटे बोलत असल्याचीही शक्यता व्यक्त केली जात आहे.

Hair Tips | केसांना अकाली पांढरे होण्यापासून रोखू शकतात ‘ही’ चार योगासने; जाणून घ्या

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  sangli crime news | father kill son dead body was found in a lake in Sangola two arrest

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update