Sangli Crime News | दारुच्या नशेत बापाने पोटच्या लेकीसोबत केले ‘हे’ धक्कादायक कृत्य

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन – Sangli Crime News | सांगलीमध्ये बाप – लेकीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. दारूच्या नशेत लोक कोणत्या थराला जातील याचा काही नेम नाही. या प्रकरणातदेखील नराधम बापाने दारूच्या नशेत आपल्या पोटच्या लेकीला विहिरीत फेकून तिची हत्या केली आहे. या घटनेमुळे सांगली जिल्हा हादरला आहे. (Sangli Crime News)

काय आहे संपूर्ण प्रकरण?
सांगली जिल्ह्यातील कुरळपमध्ये ही घटना घडली आहे. अण्णाप्पा तुकाराम कोळी असे आरोपी बापाचे नाव आहे. अण्णाप्पा कोळी आणि त्याचे कुटुंब कडकलक्ष्मीचा व्यवसाय करतात. ते कुरळपमधील माळरानावर आपल्या कुटुंबासोबत राहतात. आरोपी अण्णाप्पा तुकाराम कोळी हा मूळचा सोलापूर जिल्ह्यातील खुपशिंगी या ठिकाणचा रहिवाशी आहे. गेल्या काही वर्षांपासून अण्णाप्पा हा पत्नी आणि दोन मुलींसह कुरळपमध्ये राहत होता. घटनेच्या दिवशी अण्णाप्पा याची पत्नी लहान मुलीसह पत्नी घरातून निघून गेली होती. (Sangli Crime News)

घटनेच्या दिवशी कामावरून घरी आल्यानंतर अण्णाप्पाने आपली मुलगी श्रीदेवीला खाऊ आणायला मंगळवारी घरातून बाहेर नेले. मात्र रात्री तो घरी परतला तेव्हा त्याच्यासोबत मुलगी नव्हती.
यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी त्याच्याकडे मुलीबद्दल चौकशी केली असता अण्णाप्पाने मुलीला कुरळप-येलूर
रस्त्यावरच्या विहिरीत फेकल्याचं सांगितलं. यानंतर कुटुंबीयांनी तातडीने पोलिसांना याची माहिती दिली.
या घटनेची माहिती मिळताच कुरळप पोलीस उपअधीक्षक पद्मा कदम यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतेदह शोधण्यासाठी बुधवारी पहाटेपर्यंत शोधमोहिम राबवली. विहिरीतून रात्रभर पाण्याचा उपसा करण्यात आला.
त्यानंतर बुधवारी सकाळी सहाच्या सुमारास पोलिसांना मृत श्रीदेवीचा मृतदेह आढळून आला.
या प्रकरणी भीमराव तुकाराम कोळी यांनी पोलिसात फिर्याद दाखल केली आहे.
पोलिसांनी या प्रकरणी आरोपी नराधम बापाला अटक केली आहे. कुरळप पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Web Title :- Sangli Crime News | father killed his 4 year old daughter after drink liquor

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MLA Ravindra Dhangekar | पराभवामुळे त्यांचे डोळे उघडले, 40 टक्के सवलतीच्या निर्णयावरुन रवींद्र धंगेकरांचा सरकारला टोला (व्हिडिओ)

Jayant Patil | ‘…तोपर्यंत शिंदे गटाचं अस्तित्व उरणार नाही’, बावनकुळेंच्या वक्तव्यावरुन जयंत पाटीलांचा शिंदे गटाला धोक्याचा इशारा