Sangli Crime News | बनावट नोटा छापून वापरात आणणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; 8 लाखाच्या नोटा जप्त

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – Sangli Crime News | बनावट नोटा छापून वापरात आणणाऱ्या टोळीचा पोलिसांनी (Sangli Crime News) पर्दाफाश केला आहे. ही घटना सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर (Sangli, Islampur) येथे घडली आहे. यामधील मुख्य संशयित श्रीधर बापू घाडगे (Sridhar Bapu Ghadge) यांच्या सांगलीतील भाड्याने राहत असलेल्या घरावर पोलिसांनी (Police) छापा टाकला आहे. त्याकडून 7 लाख 66 हजार यांच्या बनावट नोटा आणि छपाईचे साहित्य जप्त केले आहे.

 

इस्लामपूर मधील आयसीआयसीआय बँकेच्या (ICICI Bank) शाखेतील पैसे भरण्याच्या डिपॉझिट मशीन मध्ये या टोळीकडून बनावट नोटा भरण्यात येत होत्या. एचडीएफसी बँकेतील अधिकारी संग्राम सदाशिव सूर्यवंशी (Sangram Sadashiv Suryavanshi) यांनी 500 रुपयांच्या 6 नोटा बनावट असल्याचं माहित असतानाही त्या डिपॉझिट मशीन मध्ये भरल्या होत्या. याप्रकरणी आयसीआयसीआय बँकेच्या अधिकाऱ्यांनी त्याच्याविरोधात 19 मे रोजी पोलिसात फिर्याद दिली होती. त्यानंतर पोलिसांनी संग्राम सूर्यवंशीकडे केलेल्या तपासात पिंटू निवृत्ती पाटील (Pintu Nivrutti Patil), सुरेश नानासाहेब पाटील (Suresh Nanasaheb Patil), मुख्य सूत्रधार श्रीधर बापू घाडगे (Sridhar Bapu Ghadge), रमेश ईश्वर चव्हाण (Ramesh Ishwar Chavan) यांची नावं समोर आली. (Sangli Crime News)

 

दरम्यान, पोलिसांनी श्रीधर घाडगेच्या घराजवळ सापळा रचला होता. त्यानंतर तो त्याच्या मोटारीतून घाईगडबडीने जात असताना पोलिसांना निदर्शनास आला. त्याच्या मोटारीची झडती घेतल्यावर 500, 200, 100, 50 आणि 20 रुपयांच्या एकूण 6 लाख 94 हजार 250 रुपयांच्या बनावट नोटांचे बंडल आढळले.
त्याच्या घराची झडती घेतली असता बनावट नोटांची छपाई करण्याचे साहित्य मिळून आले.
या बनावट नोटा छपाई करण्यासाठी वापरलेल्या प्रिंटर आणि 72 हजार रुपयांच्या बनावट नोटा आढळून आल्या.
तसेच पाण्याच्या टाकीत लपून ठेवलेले अन्य शाहित्य देखील जप्त करण्यात आले आहे.

Web Title :-  Sangli Crime News | gang exposed that print and use counterfeit notes fake currency notes worth rs 8 lakh seized sangli police arrest four member gang

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune PMC Property Tax | मिळकत करातून पुणे महापालिका मालामाल ! पहिल्या दोन महिन्यात जामा झाले तब्बल 939 कोटी

Pune Crime | शारिरीक संबंधाचा व्हिडिओ काढून ‘गे’ असल्याची बदनामी करण्याची धमकी; 24 वर्षाच्या तरुणाकडून उकळली खंडणी

Pune PMC News | नियोजनाशिवाय उभारल्या जाणार्‍या व वापराशिवाय पडून राहाणार्‍या ‘वास्तु’ उभारणीस लागणार चाप

Anti Corruption Bureau (ACB) Kolhapur | 5 हजाराची लाच घेताना मलकापूरचा वैद्यकीय अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

Krishnakumar Kunnath – Singer KK | प्रसिद्ध गायक केके यांचे 53 व्या वर्षी निधन