Sangli Crime News | सांगलीत फिल्मी स्टाईलने द्राक्ष व्यापाऱ्याचे एक कोटी रुपये लुटले

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – Sangli Crime News | सांगलीच्या तासगावमध्ये चोरट्यांनी एका द्राक्ष व्यापाऱ्याला (Grape Merchant) तब्बल एक कोटी रुपयांनी लुटल्याची (Robbed) घटना घडली आहे. 7 ते 8 चोरट्यांनी द्राक्ष व्यापाऱ्याची स्कार्पिओ गाडी अडवून एक कोटी रुपये लुटून नेले. ही घटना (Sangli Crime News) मंगळवारी (दि.28) सांयकाळी साडेसातच्या सुमारास तासगावच्या (Tasgaon) दत्तमाळ येथील गणेश कॉलनीत घडली.

 

घटनेची माहिती मिळताच तासगाव पोलीस ठाण्यातील (Tasgaon Police Station) पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांकडून आरोपींचा शोध घेण्यासाठी पतके रवाना केली आहेत. हा व्यापारी नाशिक येथील असून सध्या दत्तमाळ येथील गणेश कॉलनीत राहत आहे. व्यापाऱ्याच्या कॉर्पिओला चोरट्यांनी आपली गाडी आडवी लावून त्याच्या गाडीतून 1 कोटी रुपये असलेली बॅग चोरून नेली. (Sangli Crime News)

 

सुमारे 7 ते 8 जणांनी द्राक्ष व्यापाऱ्याला लुटल्याचे सांगण्यात येत आहे.
या घटनेला तासगाव पोलिसांनी अधिकृत दुजोरा दिलेला आहे.
घटनास्थळी पोलिस अधिक्षक बसवराज तेली (SP Basavaraj Teli) दाखल झाले आहेत.
पोलीस पुढील चौकशी करत आहेत.

Web Title :- Sangli Crime News | In Sangli, Filmi Style robbed a grape trader of one crore rupees

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Mumbai Suburban District Level Youth Award | मुंबई उपनगर जिल्हास्तर युवा पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

MLA Sanjay Shirsat | सुषमा अंधारेंच्या तक्रारीची महिला आयोगाने घेतली दखल, पोलीस आयुक्तांना दिले कारवाई करण्याचे निर्देश

Sanjay Naval Koli Death | कोकण विभागीय माहिती कार्यालयाचे संजय कोळी यांचे दीर्घ आजाराने निधन

Pune Pimpri Chinchwad Crime | पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेकडून प्रतिबंधीत गुटखा जप्त, एकाला अटक