Sangli Crime News | ओडिशामधून सांगलीत गांजा तस्करी करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे पथकाकडून कडक कारवाई

पोलीसनामा ऑनलाइन : Sangli Crime News | सांगली येथे ओडिशातील एकाकडून गांजा घेऊन तो मिरजेतील गुरुजीला विकण्यासाठी घेऊन जात असताना स्थानिक गुन्हे अन्वेषणाने चौघांना अटक केली आहे. कवठेपिरान येथे 21 लाखांचा जवळपास 102 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी ओडिशा येथील गांजा तस्करांच्या मुस्क्या देखील आवळण्यात आल्या आहेत आणि मिरज येथील गांजा तस्करी करणारे गुरुजी यांनाही अटक करण्यात आली आहे. (Sangli Crime News)

22 फेब्रुवारी रोजी एलसीबीने कवठेपिरान येथे छापा टाकला असता 20 लाख 40 हजार म्हणजेच तब्बल 102 किलो पेक्षा अधिक ओला गांजा जप्त करण्यात आला आहे. जप्त करण्यात आलेला गांजा हा तेलंगणा आंध्र प्रदेश आणि ओडिशा येथून मिरजेत आणि तिथून पुढे संपूर्ण जिल्ह्यात विक्री केला जाणार होता असे उघडकीस आले. या कारवाईत पथकातील सहाय्यक निरीक्षक संदीप शिंदे हे तीनही राज्यात सलग पाच दिवस संशयतांच्या शोधात होते. यादरम्यान ओडिसा येथील गजपती जिल्ह्यातील मोहन येथे संशयित कुमार प्रभा लिमा उर्फ राजू भाई याचा शोध करण्यास सुरुवात केली. यावेळी हा संशयित जंगलात लपून बसल्याची माहिती पथकाला मिळाली होती. (Sangli Crime News)

पथकाने कुमार प्रभा लीमा उर्फ राजू भाई याचा साथीदार संदीप पत्रिका बेहरा याचा पाठलाग करून त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याला मोहनी न्यायालयात हजर करून सांगलीला रवाना करण्यात आले. त्याच्याकडे चौकशी केली असता ओडिशा राज्यातून सांगलीत आणलेल्या गांजा पैकी मिरज मधील गुरुजी उर्फ हुसेन मौनुद्दीन मल्ला याला काही किलो गांजा विकल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी मिरज मध्ये देखील छापा टाकून गुरुजी उर्फ मुल्ला याला अटक केली आहे. ही संपूर्ण कारवाई पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक निरीक्षक संदीप शिंदे उपनिरीक्षक विशाल येळेकर, जितेंद्र जाधव, राजू शिरोळकर, संदीप पाटील, मच्छिंद्र बर्डे, अमोल केदारे, राहुल जाधव, संकेत मगदूम, आर्यन देशिंगकर, गौतम कांबळे, अजय बेंदरे , कॅप्टन गुंडवाडे यांनी केली आहे.

संजीव पत्रिक बेहरा (वय 27, रा. कीर्तिकी, पोस्ट पिंडिकी, जि. गजपती) आणि
गुरुजी उर्फ हुसेन मैनुद्दीन मुल्ला (वय 48, रा. दर्गा चौक, मिरज) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची
नावे आहेत. तर या सगळ्या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार गांजा पुरवठा करणारा कुमार प्रभा लिमा उर्फ राजू भाई
(रा. ओरिसा) हा फरार आला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

Web Title :-  Sangli Crime News | Strict action by local crime squad against ganja smugglers from Odisha to Sangli

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Hemant Rasane | रवीभाऊ, देवेंद्रजींविषयी बोलताना तारतम्य बाळगा, हेमंत रासनेंचा धंगेकरांना सल्ला

Aurangabad Accident News | अपघाताचे फोटो काढताना घडली दुर्दैवी घटना; 53 वर्षीय व्यक्तीला विनाकारण गमवावा लागला जीव

MPSC Recruitment | MPSC कडून तब्बल 673 जागांवर होणार भरती; सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी मोठी संधी