Sangli Crime News | विहिरीच्या पाण्यावरून झालेला वाद काका-पुतण्याच्या जीवावर बेतला; सांगलीमधील घटना

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन – Sangli Crime News | आजकाल एका जमिनीच्या तुकड्यासाठी भावा-भावांमध्ये वाद झाल्याचे आपण पहिले किंवा ऐकले असेल. अशीच एक घटना सांगलीमध्ये घडली आहे. यामध्ये विहिरीच्या पाण्याच्या वादावरून काका-पुतण्याची हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. या हल्ल्यात 3 जण जखमी झाले आहेत. (Sangli Crime News)

काय आहे नेमके प्रकरण?

सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातल्या कोसारी या ठिकाणी ही घटना घडली आहे. विलास नामदेव यमगर, (वय 45) आणि प्रशांत दादासो यमगर (वय 23) असे यामध्ये मृत झालेल्या काका-पुतण्याची नावे आहेत. सामाईक विहिरीच्या पाण्यावरून भावकीमध्ये झालेल्या हाणामारीतून हि घटना घडली आहे. यामध्ये एकाच कुटुंबातील दोघांचा मृत्यू तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. (Sangli Crime News)

जत तालुक्यातल्या कोसारी या ठिकाणी यमगर ही भावकी राहते. त्यांच्या शेतामध्ये एकच विहीर आहे.
आज सकाळी पाण्याची पाळी कोणाची यावरून वाद झाला.
यानंतर हा वाद टोकाला पोहोचला आणि यातून यमगर कुटुंबातील सुमारे दहा ते पंधरा जणांनी विलास शंभर
आणि प्रशांत यमगर यांच्या कुटुंबावर हल्ला केला.
या हल्ल्यात विलास यमगर आणि प्रशांत यमगर या दोघांची हत्या करण्यात आली आहे.
तर दादासो नामदेव यमगर, यशवंत भाऊ खटके आणि विजय विलास यमगर हे गंभीर जखमी झाले आहेत.
या घटनेची माहिती मिळताच जत पोलिस घटनास्थळी दाखल झाले.
त्यांनी जखमींना तातडीने जत शहरातल्या शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले आहे.
जत पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

Web Title : Sangli Crime News | uncle nephew killed for well water incident in sangli

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Shrimant Dagdusheth Ganpati | ‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात २ हजार किलो द्राक्षांची आरास; संकष्टी चतुर्थीनिमित्त द्राक्ष महोत्सवाचे आयोजन

Pune Crime News | कागदपत्रावर सही करण्यासाठी एजंटची आरटीओ निरीक्षकाला मारहाण; फुलेनगरमधील आरटीओ कार्यालयातील प्रकार

Kolhapur ACB Trap | फसवणुकीच्या गुन्ह्यात ८ लाखांची लाच घेताना एपीआयसह दोघांना पकडले; जुना राजवाडा पोलीस ठाण्यात मध्यरात्री कारवाई

Cucumber Benefits | उन्हाळ्यातील आहारात काकडीचा समावेश केलाच पाहिजे, आरोग्यासाठी ‘या’ बाबींमध्ये विशेष फायदा