Sangli Crime | सांगलीत हत्याराची तस्करी करणार्‍या टोळीला अटक; 3 पिस्तूल, 6 जिवंत काडतुसे जप्त

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन –  Sangli Crime | सांगली जिल्ह्यातील मिरज ग्रामीण पोलीसांनी (Miraj Rural Police) शस्त्रांची तस्करी करणाऱ्या टोळीला अटक (Arrest) केली आहे. त्याचबरोबर त्यांच्याजवळ असणारा मोठा शस्र साठा जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी तिघांना अटक करत 3 देशी बनावटीचे पिस्तूल आणि 6 जिवंत काडतुसे जप्त (Weapons seized) केले आहेत. शस्त्र तस्करी करण्यासाठी आले असता मिरज-पंढरपूर रोडवरील तानंग फाटा याठिकाणी ही कारवाई (Sangli Crime) केली गेली आहे.

याबाबत माहिती अशी, मिरज-पंढरपूर रोड (Miraj-Pandharpur Road) वरील तानंग फाटा
या ठिकाणी काही इसम शस्त्र विक्री करण्यासाठी येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
या माहितीच्या आधारावर पोलिसांनी या ठिकाणी सापळा रचला.
त्यावेळी फोर व्हीलरजवळ थांबलेल्या गौस उर्फ निहाल मोमीन (वय 23 रा. इदगाह माळ, मिरज),
सुरेश हत्तेकर (वय 29 रा. सुभाषनगर, मिरज) आणि तौफिक शेख (वय 2, रा. इदगाह, मिरज)
या तिघांना ताब्यात घेऊन त्यांची अंगझडती घेतली.

दरम्यान, झडती घेतल्यानंतर पोलीसांना त्यांच्याकडे देशी बनावटीचे पिस्तूल 6 जिवंत काडतुसे सापडली. त्यानंतर पोलिसांनी या तिघांनाही अटक करत त्यांच्या ताब्यातील क्षेत्र आणि फोरव्हीलर गाडी असा एकूण 3 लाख 46 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
तसेच, त्या तिघांच्याकडे पिस्तूल कुठून आणली आणि ती कोणाला विक्री करण्यात येत होती याबाबत चौकशी पोलीस (Police) करत आहेत.

 

Web Title : Sangli Crime | sangli police arrest a gang who sales illegal weapons also seized weapons

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Gold Price Today | सोनं मिळतंय 10000 रुपये ‘स्वस्त’, गुंतवणुकीची चांगली संधी; पहा 10 ग्रॅम सोन्याचे नवीन दर

Ajit Pawar | ST कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा ! उपमुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर तातडीने 500 कोटी निधी वितरित

Maharashtra Lockdown | राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागणार?; राजेश टोपेंनी दिली महत्वाची माहिती