Sangli Crime | सांगलीत युवकाचा निर्घृण खून; शहरात प्रचंड खळबळ

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – Sangli Crime | रस्त्यावर अंडा भुर्जीचा व्यवसाय करणाऱ्या युवकाचा धारदार शस्त्रांनी वार करून हत्या (Murder In Sangli) करण्यात आल्याची धक्कादायक घटना सांगलीत (Sangli Crime) घडली आहे. 3 अज्ञात हल्लेखोरांनी युवकाची हत्या करुन चालवत असलेल्या गाड्याचीही तोडफोड केली आहे. ही घटना सांगलीतील शंभर फुटी रोडवर घडली. संतोष पवार (Santosh Pawar) असं खून झालेल्या युवकाचे नाव आहे.

 

याबाबत माहिती अशी की, सांगलीतील विश्रामबाग शंभर फुटी रोड वर असणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाजवळ संतोष पवार हा अंडा भुर्जीचा व्यवसाय करत होता. छोट्या चारचाकी गाडीमधून त्याचा हा व्यवसाय सुरू होता. रविवारी संध्याकाळी आठ वाजताच्या सुमारास आलेल्या 3 हल्लेखोरांनी धारदार शस्त्रांनी संतोष पवार याच्यावर हल्ला (Attack) केला. या हल्ल्यामध्ये संतोषचा जागीच मृत्यू (Died) झाला. (Sangli Crime)

या घटनेनंतर हल्लेखोरांनी संतोषच्या चारचाकी वाहनाचीही तोडफोड करत साहित्य रस्त्यावर फेकून दिले आहे.
तसेच हल्लेखोर पसार झाले. या घटनेबाबत माहिती समजताच विश्रामबाग पोलिस (Vishrambaug Police, Sangli) घटनास्थळी दाखल झाले.
त्यानंतर पंचनामा करण्यात आला. या घटनेने परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे.
ही हत्या नेमकी कोणत्या कारणातून झाली याची माहिती अजून समोर आली नसून या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

 

Web Title :- Sangli Crime | Santosh Pawar Murder Case Vishrambaug Police

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा