Sangli Crime | पगारापेक्षा अधिकची संपत्ती जमवणाऱ्या विविध कार्यकारी सोसायटीच्या सचिवाला 2 वर्षे सक्त मजुरी, 50 हजाराचा दंड

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन –  Sangli Crime | शासकीय नोकरीत (government job) असताना मिळणाऱ्या पगारापेक्षा अधिकची मालमत्ता जमवणाऱ्या सांगली जिल्ह्यातील (Sangli Crime) दिघंची विविध कार्यकारी सोसायटीच्या सचिवाला जिल्हा व सत्र न्यायाधीश पोळ (District and Sessions Judge Pol) यांनी दोन वर्षाची सक्त मजुरी आणि 50 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. अरविंद बाबुराव देशपांडे Arvind Baburao Deshpande (वय-63) असे शिक्षा झालेल्या सचिवाचे (Secretary) नाव आहे. अ‍ॅड. महेंद्र शेटे (Adv. Mahendra Shete) यांनी देशपांडे यांच्या मालमत्तेची चौकशी करण्याची मागणी केली होती.

तक्रारदार अ‍ॅड. शेटे यांनी केलेल्या अर्जावरुन तत्कालीन पोलीस निरीक्षक अनिल पाटील (Police Inspector Anil Patil) यांनी देशपांडे यांच्या मालमत्तेची चौकशी केली होती.
देशपांडे यांनी 1998 ते 2007 या कालावधीत उत्पन्नापेक्षा अधिक प्रमाणात मालमत्ता जमवल्याचे निष्पन्न झाले.
त्यांनी 13 लाख 16 हजार 374 म्हणजेच 40.93 टक्के अधिकची मालमत्ता जमवली होती.
तसेच याबाबत देशपाडे यांना बाजू मांडण्यास सांगण्यात आले होते. मात्र, त्यांना आपली बाजू मांडता आली नाही.

त्यामुळे तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांनी पुणे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे (Pune Anti Corruption Bureau)
देशपांडे यांच्या विरोधात गुन्हा (FIR) दाखल करण्याची परवानगी मागितली होती.
त्यानुसार पुणे लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे पोलीस अधीक्षक यांनी गुन्हा दाखल करण्यास मंजूरी दिली होती.
त्यानुसार देशपांडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

 

दाखल गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलीस उप अधीक्षक अंकुश इंगळे (Deputy Superintendent of Police Ankush Ingle) यांनी करुन देशपांडे याच्याविरोधात न्यायालयात दोषारोप पत्र सादर केले होते. देशपांडे याने उत्पन्नापेक्षा अधिक मालमत्ता जमवल्याचे सिद्ध झाल्याने जिल्हा व सत्र न्यायाधीश पोळ यांनी आरोपी अरविंद देशपांडे याला दोन वर्षे सक्त मजुरी व 50 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. (Sangli Crime) या खटल्यामध्ये सरकारच्या वतीने अतिरिक्त सरकारी वकिल अनिल कुलकर्णी (Additional Public Prosecutor Anil Kulkarni) यांनी काम पाहिले.
तर लाचलुचप प्रतिबंधक विभागाच्या सांगली कार्यालयातील पोलीस अंमलदार विना जाधव, तत्कालीन अंमलदार अशोक तुराई, धनंजय चव्हाण, शशी कलकुटगी यांनी सहकार्य केले.

 

Web Title : Sangli Crime | Secretary of various executive societies who amassed wealth in excess of his salary was fined Rs 50,000, 2 years hard labor.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pankaja Munde | करुणा शर्मा प्रकरण : पंकजा मुंडे यांचा धनंजय मुंडेंवर हल्लाबोल; म्हणाल्या…

7th Pay Commission | सरकारी कर्मचार्‍यांना ‘या’ आठवड्यात मिळेल डबल ‘बोनस’, जाणून घ्या किती वाढून येणार वेतन

LPG Cylinder Update | जुन्या LPG सिलेंडरच्या बदल्यात घ्या नवीन फायबर ग्लास कम्पोझिट सिलेंडर, किंमत जवळपास सारखीच; जाणून घ्या फायदे?