Sangli Crime | सांगलीतील धक्कादायक घटना ! महिला सावकाराच्या त्रासाला कंटाळून युवकाची पोलीस ठाण्यात आत्महत्या

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – Sangli Crime | सांगली येथे एका महिला सावकाराच्या वसुलीच्या त्रासाला कंटाळून एका युवकाने थेट पोलिस ठाण्यातच आत्महत्या (Police Station Suicide) केल्याची धक्कादायक घटना (Sangli Crime) समोर आली आहे. सांगली शहर पोलीस ठाण्याच्या (Sangli City Police Station) टेरेसवर या युवकाने विषप्राशन (Poisoning) करून आत्महत्या केल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. अतुल गरजे-पाटील (Atul Garje-Patil) असं आत्महत्या केलेल्या युवकाचं नाव आहे.

याबाबत माहिती अशी, अतुल हा शहर पोलीस ठाण्यात साफसफाई कर्मचारी म्हणून काम करत होता. तर एका महिला सावकाराच्या वसुलीच्या जाचाला कंटाळून त्याने, ही आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान आत्महत्येपुर्वी अतुल पाटील याने एक चिट्ठी लिहिली असून, ती पोलिसांच्या हाती लागली आहे. ज्यात सावकार महिलेचा नावाचा उल्लेख असून वसुलीचा तगादा लावल्याने याला कंटाळून आत्महत्या केल्याचे अतुल याने चिट्ठीत नमूद केलं आहे. असं पोलिसांनी सांगितलं. (Sangli Crime)

दरम्यान, शहर पोलीस ठाण्यातच घडलेल्या या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. याप्रकरणी अधिक तपास सांगली शहर पोलीस (Sangli City Police Station) करीत आहेत.

Web Title : Sangli Crime | Suicide of youth in sangli

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

शारीरीक संबंधाचे व्हिडिओ व्हायरल करण्याची दिली धमकी;
घरी, वेगवेगळ्या हॉटेल रुममध्ये आणि कारमध्ये बोलावून लैंगिक अत्याचार

 

Navneet Ravi Rana Sent To Judicial Custody | राणा दाम्पत्याच्या अडचणीत मोठी वाढ !
कोर्टाने सुनावली 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, जामीन अर्जावरील सुनावणीही लांबणीवर

 

 घरात घुसून 18 वर्षाच्या तरुणीचा विनयभंग, हडपसरच्या फुरसुंगी परिसरातील घटना

 

Pune Crime | इन्स्टाग्रामवर बनला मित्र, 20 वर्षाच्या तरुणीला कोल्ड्रींग मधून गुंगीचे औषध देऊन दाखवलं ‘काम’,
बलात्कार प्रकरणी FI