Sangli Crime | तासगाव-भिलवडी रोडवर छोटा हत्तीची तिघांना धडक; RTI कार्यकर्ता संघटनेच्या जिल्हाध्यक्षासह दोघांचा मृत्यू

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – Sangli Crime | भरधाव वेगात आलेल्या छोटा हत्तीची धडक तिघांना बसून दोघांचा जागीच मृत्यू झाला तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात (Accident) सांगली जिल्ह्यातील (Sangli Crime) तासगाव तालुक्यातील तासगाव-भिलवडी रोडवर (Tasgaon-Bhilwadi Road) रविवारी (दि.30) रात्री साडे अकराच्या सुमारास झाला. या अपघातात सांगली जिल्ह्यातील माहिती अधिकार कार्यकर्ता संघटनेच्या (Right to Information Activists Association) जिल्हाध्यक्षासह एकाचा जागीच मृत्यू (Death) झाला आहे.

 

माहिती अधिकार कार्यकर्ता संघटनचे जिल्हाध्यक्ष राहुल नारायण शिंदे Rahul Narayan Shinde (रा. शिवाजीनगर, तासगाव), दीपक उर्फ शिवाप्पा शिदलींग स्वामी Deepak alias Shivappa Shidling Swami (रा. नाट्यगृहाजवळ, तासगाव) असे मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत. तर सचिन दत्तात्रय बाबर Sachin Dattatraya Babar (रा. शिक्षक कॉलनी, पुनदी रस्ता, तासगाव) हे गंभीर जखमी झाले आहेत. (Sangli Crime)

 

मिळालेल्या माहितीनुसार, राहुल शिंदे, दीपक स्वामी व सचिन बाबर हे तासगाव-भिलवडी रस्त्यावरील एका ढाब्यावर जेवण करण्यासाठी गेले होते.
रात्री उशीरा जेवण करुन ते ढाब्याच्या बाहेर रस्त्याच्या कडेला बोलत थांबले होते.
त्यावेळी भिलवडीच्या दिशेकडून भरधाव वेगात आलेल्या छोटा हत्ती (एमएच 10 बी आर 5204) या वाहनाची तिघांना जोरदार धडक बसली.

ही धडक एवढी जोरात होती की, या धकडेत तिघांच्याही डोक्याला मार लागून ते रस्त्यावर जोरात आपटले.
यामध्ये राहुल शिंदे आणि दीपक स्वामी यांचा जागीच मृत्यू झाला. तर सचिन बाबर हे गंभीर जखमी (Seriously Injured) झाले.
बाबर यांना तातडीने खाजगी रुग्णालयात (Private Hospital) उपचारासाठी दाखल करण्यात आले.
त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले.

 

 

Web Title :-  Sangli Crime | Three hit by small elephant on Tasgaon-Bhilwadi road; Death of two including the district president of RTI workers union

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Nikki Tamboli Bold Photo | निक्की तांबोळीच्या बोल्ड फोटोनं सोशल मीडियावर लावली आग, स्टायलिश लूकमध्ये दिल्या जबरदस्त पोज

 

Menstrual Pain Home Remedies | मासिक पाळी दरम्यानच्या वेदनांमुळं त्रस्त झाला आहात? तर जाणून घ्या काही खास टिप्स

 

Post Office Saving Scheme | पोस्ट ऑफिसच्या ‘या’ स्कीममध्ये दर महिना 5000 रुपयाची करा गुंतवणूक, जाणून घ्या किती मिळेल फंड आणि फायदा