Sangli Crime | सिगारेट आणायला उशीर झाल्याने मित्रावर सपासप वार करून खून

सांगली न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  सांगली (Sangli Crime) जिल्ह्यातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मद्यपार्टी (Wine party) सुरू असताना सिगारेट आणायला उशीर झाल्याने दोघांनी आपल्या जीवलग मित्राचा कोयत्यानं वार करत खून (Murder) केला आहे. ही घटना सांगलीतील मिरज तालुक्यातील आहे. दत्तात्रय झांबरे (Dattatraya Zambare) असं हत्या (Sangli Crime) झालेल्या युवकाचे नाव आहे. तसेच, अमोल खामकर आणि सागर सावंत अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत फिर्याद मृत तरुणाच्या कुटुंबीयांनी दिली आहे. यावरून त्या दोघांना मिरज पोलिसांनी (Miraj Police) अटक केली आहे.

याबाबत माहिती अशी, मृत दत्तात्रय झांबरे हा 28 जुलै रोजी त्याचे मित्र अमोल आणि सागर यांच्या बरोबर होता.
तेव्हापासूनच दत्तात्रय गायब झाल्याची माहिती कुटुंबीयांनी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात (Miraj Rural Police Station) दिली होती.
दरम्यान कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली.
यांनतर दत्तात्रय हा गायब नसून त्याची हत्या (Murder) झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
याप्रकरणी मृत तरुणाच्या मित्रांना ताब्यात घेत त्यांची पोलिसांनी चौकशी केल्यानंतर हे बिंग फुटलं आहे.
दारू पिल्यानंतर शिवीगाळ केल्याच्या रागातून आरोपींनी हा खून केल्याचा पोलीस तपासात निष्पन्न झालं आहे.

दरम्यान, आरोपींनी मद्यपार्टी केली होती. पार्टी सुरू असताना आरोपींनी दत्तात्रय याला सिगारेट आणायला पाठवलं.
मात्र, दत्तात्रयला सिगरेट आणण्यासाठी उशीर झाला.
यातून वादाला तोंड फुटलं. म्हणून आरोपी अमोल आणि सागरनं दत्तात्रयवर कोयत्यानं सपासप करत दगडानं डोकं ठेचलं.
यानंतर आरोपींनी पुरावा नष्ट करण्यासाठी दत्तात्रयच्या मृतदेहाचे तुकडे करून ते कुपनलिकेत टाकले आहे. असं एका वृत्तानुसार समजते.
याप्रकरणी पुढील तपास पोलीस (Police) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Crime | ट्रस्टचे अध्यक्ष व सचिव असल्याचे भासवून 7.76 कोटींची फसवणूक; दोघांविरुद्ध गुन्हा

Delta Plus Variant | पुणे शहरात ‘डेल्टा प्लस व्हेरिएंट’चा पहिला रूग्ण

Maharashtra Sadan Scam | भुजबळांच्या दोषमुक्ततेला ‘लाचलुचपत’चा विरोध, ACB चा न्यायालयात युक्तीवाद