सांगली : ब्रह्मनाळमधील बोट दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला, आणखी 8 मृतदेह सापडले

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन – सांगली जिल्ह्यामध्ये पूर परिस्थीती गंभीर झाली आहे. पलूस तालुक्यातील ब्रह्मनाळ येथे आलेल्या महापुरामध्ये बोट उलटून मोठी दुर्घटना घडली होती. या दुर्घटनेत पुराच्या पाण्यात बुडून मृत्यू झालेल्यांची संख्या १७ वर पोहचली आहे. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांचे आणखी ८ मृतदेह सापडले आहेत. ब्रह्मनाळ येथे कृष्णा नदीच्या महापुरात बोट उलटून नऊ जणांना जलसमाधी मिळाली होती. ही घटना गुरुवारी (दि.८) घडली होती.

बोट उलटून झालेल्या दुर्घटनेत ९ जणांचा मृत्यू झाला होता. तर काहीजण बेपत्ता झाले होते. बेपत्ता झालेल्या ८ जणांचे आज मृतदेह सापडले आहेत. शुक्रवारी मध्यरात्री तीन तर शनिवारी सकाळी पाच मृतदेह सापडले आहेत. एडीआरएफच्या टीमकडून या मृतदेहांचा शोध घेण्यात आला. सापडलेल्या मृतदेहांमध्ये तीन महिला, एक मुलगा आणि एका मुलीचा समावेश आहे. या घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या १७ वर पोहचली आहे.

सुरेखा नरुटे, रेखा वावरे(४०), मनीषा पाटील (अडीच वर्षे), क्षिति पाटील(७), राजमती चौगुले(६५), बाबासो पाटील, कल्पना कारंडे, लक्ष्मी वडेर(७०), पियू नरुटे (दीड महिना), सौरभ गडदे, सुवर्ण तानाजी गडदे, गंगूबाई कस्तुरे, पप्पीताई पाटील, सुमन रोगे, कोमल नरुटे अशी मृतांची नावे आहेत.

अशी घडली घटना…

ब्रह्मनाळ येथील कृष्णा नदीला आलेल्या पुरामुळे काही नागरिक गावामध्ये अडकले होते. पुरात अडकलेल्या २५ ते ३० जणांना सुरक्षित ठिकाणी घेऊन जात असताना बोट उलटली. यानंतर बोटीतील १० जणांचे मृतदेह सापडेल तर काहीजण बेपत्ता झाले होते. क्षमतेपेक्षा जास्त लोक या बोटीत बसल्याने ही दुर्घटना घडल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र बोट झाडाला अडकल्याने उलटल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे.

आरोग्यविषयक वृत्त