काय सांगता ! होय, ‘ही’ मांसाहारी बकरी रोज खाते ‘अंडी’ ! (व्हिडीओ)

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन – एक अंडी खाणारी बकरी समोर आली आहे. काय झालं ? वाचून विश्वास बसत नाही ना ? होय, पण हे खरं आहे की, एक अशी बकरी समोर आली आहे जी मांसाहारी आहे. ही बकरी गवत किंवा घास नाही तर चक्क अंडी खाऊन जगते. सध्या या बकरीची सर्वत्र चर्चा सुरू आहे. या बकरीचा अंडी खातानाचा एक व्हिडीओदेखील समोर आला आहे जो सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार सांगली जिल्ह्यातील वाझर गावातील ही बकरी आहे. व्हिडीओत बकरी एक नाही, दोन नाही तर अनेक अंडी खाताना दिसत आहे. ही बकरी मांसाहारी कशी झाली हे काही समजू शकलेलं नाही. परंतु बकरीच्या अंडी खाण्याने सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केलं आहे. सध्या हा व्हिडीओ सोशलवर झपाट्याने व्हायरल होताना दिसत आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार ही बकरी दत्तात्रय जाधव यांच्या फार्म हाऊसमधील आहे. काही दिवसांपासून बकरीच्या शेडपाशी ठेवलेली अंडी गायब होत होती. अंडी कुठे जात होती याचा शोध काही केल्या लागत नव्हता. यानंतर बारीक नजर ठेवल्यावर जे सत्य समोर आलं त्यानंतर सर्वजण चकित झाले. कारण ही बकरीच सारी अंडी फस्त करत होती. यानंतर त्या बकरीला रोजच खाण्यासाठी अंडी देण्यास सुरुवात झाली. आता ही बकरी नियमित अंडी खाते. बकरीचा मालक तिला न चुकता रोज अंडी खायला घालतो. बकरीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर जाधव यांच्या शेतात या बकरीला पाहण्यासाठी लोकांची गर्दी वाढू लागली आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/