सांगली : पोलिस असल्याची बतावणी करत दागिने केले लंपास

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – सांगली येथील एका अज्ञाताने पोलीस असल्याचे बतावणी करून आप्पासाहेब पाटीलनगरमधील महिलेचे २ तोळ्यांचे दागिने लंपास केले आहे. हि घटना शनिवारी घडली आहे. मंगल दिलीप नाईक (वय ५८, रा. आप्पासाहेब पाटीलनगर, सांगली ) या महिलेने या प्रकरणावरुन सांगली शहर पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. यावरून शहर पोलिसांकडून त्या अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहितीनुसार, मंगल नाईक या शनिवारी सायंकाळच्या दरम्यान फिरण्यास गेल्या होत्या. त्यावेळी एक अज्ञात समोरून येत होता. समोर येऊन मी पोलिस आहे. कोरोनामुळे सध्या लॉकडाऊन आहे. आमचे साहेब आले आहेत. तुम्ही का फिरत आहात. तुमच्याकडे असलेले दागिने तातडीने काढून द्या, नाहीतर पोलिस तुमच्यावर कारवाई करतील, असे त्याने महिलेला सांगितले. त्या महिलेने भिऊन गळ्यात असणारे २ तोळ्यांचे दागिने लगेच काढून दिले. तर तसेच, त्यावेळी त्या अज्ञाताने दुसर्‍या एका मुलाच्या हातातील अंगठी काढून घेतली. तर काही वेळानंतर आपली फसवणूक झाल्याचे त्या महिलेचे लक्षात आल्यास तात्काळ त्या महिलेने पोलिस ठाण्यात धाव घेतली. या प्रकरणावरून पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा नोंद केला आहे.