सांगली : एलसीबीचा बुधगावमध्ये जुगार अड्ड्यावर छापा, ९ अटकेत

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन

शेतामध्ये असलेल्या एका पत्र्याच्या शेडमध्ये सुरु असलेल्या जुगार आड्डयावर स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने छापा टाकून ९ जणांना अटक केली. ही कारवाई रविवारी (दि.१२) सायंकाळी पाचच्या सुमारास बुधगाव-कुपवाड रस्त्यावरील दत्ता पाटील यांच्या शेतात करण्यात आली. या कारवाईत पोलिसांनी मोटारसायकल, मोबाईल, रोख रक्कम असा एकूण पाच लाखांचा ऐवज जप्त केला.
[amazon_link asins=’B077PWBC7J’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’a99d2ea2-9e46-11e8-8377-d73e2c3f9dd3′]

विठ्ठल काशिनाथ जगताप (वय 28, रा. कवलापूर), सचिन रघुनाथ पाटील (वय 30, रा. बिसूर), कृष्णा सिद्धू बाबर (वय 29, रा. कवलापूर),  व्यंकटेश संभाजी पाटील (वय 31, रा. कवलापूर), अभिजित नितीन पाटील (वय 27, रा. बुधगाव), निवास गणपती पाटील (वय 26, रा. कवलापूर), सचिन गजानन माने (वय 31, रा. कवलापूर), सतीश विलास देसाई (वय 27, रा. बुधगाव), श्रीरंग सिद्धू बाबर (वय 20, रा. कवलापूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा, अतिरिक्त अधीक्षक शशिकांत बोराटे यांनी जिल्ह्यातील अवैध व्यवसायावर कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला दिले आहेत. पोलिस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांना बुधगाव-कुपवाड रस्त्यावर एका शेतात तीन पानी पत्त्यांचा जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती खबर्‍याद्वारे मिळाली होती. त्यांनी पथकाला कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारास पथकाने दत्ता पाटील यांच्या शेतातील पत्र्याच्या शेडवर छापा टाकला.
[amazon_link asins=’B0784D7NFX’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’aec6985d-9e46-11e8-a31f-33e83dda651b’]

त्यावेळी जुगार खेळणार्‍या नऊजणांना रंगेहात अटक करण्यात आली. त्यांच्याकडून जुगाराचे साहित्य, 11 मोबाईल, 9 मोटारसायकल, 14 हजार 560 रूपये रोख असा सुमारे पाच लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याबाबत सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

निरीक्षक पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक अमितकुमार पाटील, अमित परीट, युवराज पाटील, संजय पाटील, सागर टिंगरे, गजानन घस्ते, राजेंद्र मुळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.