तासगावमध्ये हातभट्टी दारू निर्मिती अड्डा उध्वस्त, तिघांना अटक

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने शनिवारी तासगावमध्ये हातभट्टी दारू निर्मिती अड्डा उध्वस्त केला. यावेळी २७ हजार ६५४ रुपयांची दारू व अन्य साहित्य जप्त करण्यात आले. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आले आहे. याबाबत तासगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी अवैधरित्या गावठी, हातभट्टी दारू तयार करून विकणाऱ्यावर कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक तयार करण्यात आले आहे. ते पथक तासगाव विभागात गस्त घालत असताना बजरंग मंडले चिंचणी येथील शिवाजी पाखरे यांच्या विहिरीजवळ शिवाजी गणू माळी यांच्या शेतात बेकायदेशीरपणे हातभट्टीची दारू तयार करीत असून चिंचणी गावात रंजना बुधावले व सुनीता जाधव या दोघी नाईकवस्तीवर त्याची विक्री करीत असल्याची माहिती मिळाली.

त्यानुसार पथकाने तेथे छापा टाकला. तेथून ५७० लिटर रसायन, ५ लिटर तयार गावठी दारू व अन्य साहित्य जप्त केले. रंजना रंगराव बुधावले हिच्याकडून २५ लिटर तयार दारू तसेच सुनीता अनिल जाधव हिच्याकडून २५ लिटर तयार गावठी दारू जप्त केली. ही कारवाई निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केली.

Visit : policenama.com