सांगलीत शाहीनबाग आंदोलनातील नेत्याची सभा

सांगली : पोलिसनामा ऑनलाईन – दिल्लीच्या शाहीनबाग आंदोलनातील प्रमुख नेत्यांची चौघांची टीम एनआरसी, सीएए कायद्याविरोधात सांगलीतील स्टेशन चौकात (वसंतबाग) गेली 32 दिवस आंदोलन सुरू आहे. त्याला पाठिंबा देण्यासाठी शनिवारी ( ता . २२ ) सांगलीत येणारआहे. वसंतबाग आंदोलनाच्या संयोजकांनी सांगितल्यानुसार यानिमित्ताने स्टेशन चौकात सायंकाळी 6 वाजता भव्य सभा होणार आहे.
सभेसाठी असोसिएशन ऑफ मुस्लिम इंटिलेक्‍च्युअल मुस्लिमस्चे टी. एम. जियाऊलहक, जेएनयू दिल्ली विद्यापीठाच्या अमृता पाठक, आसाम अल्पसंख्याक विद्यार्थी संघाच्या सेक्रेटरी हसिना अहमद, दिल्ली विद्यापीठाच्या स्वाती खन्ना यांचा समावेश असणार आहे.

केंद्रातील भाजप सरकारने बेकारी, निष्क्रिय कारभाराचे अपयश लपविण्यासाठी एनआरसी, सीएएसारखे कायदे मंजूर करून जातीय तेढ निर्माण करण्याचा घाट घातला आहे. भाजप सरकारने गोरगरीब, कष्टकरी, सर्वच समाजाला वेठीस धरण्याचा उद्योग केला आहे पण त्याला देशातून विरोध होत आहे . शाहिनबाग आंदोलन हे त्याचा केंद्र बिंदू आहे .सांगलीत ३२ दिवसापासून वसंतबाग येथे एल्गार सुरू आहे. यामध्ये धर्मनिरपेक्ष, पुरोगामी विचारसरणीच्या कार्यकर्ते व सर्व समाजघटकातून या आंदोलनाला पाठिंबा मिळत आहे. असे समितीचे अय्याज नायकवडी, उमर गवंडी, आयुब पटेल म्हणाले

पश्‍चिम महाराष्ट्रात सर्वाधिक मोठे आंदोलन सांगलीत होत आहे. या आंदोलनात 64 पेक्षा अधिक राज्यस्तरीय, देशपातळीवरील नेत्यांनी पाठिंबा दिला आहे. आंदोलनाची दखल शाहीनबागनेही घेतली आहे. आता यात अजून वरील चौघेजनाचे पाठबळ वाढणार आहे. शाहीनबागच्या आंदोलनाबाबत दोन दिवसांत तोडगा निघण्याची शक्‍यता आहे. त्यानुसार निर्णय झाल्यास 22 तारखेला वसंतबाग येथील आंदोलन या सभेने संपविण्यात येईल. नंतर NRC आणि CAA विरोधात मोहीम राबविली आहे .

आंदोलनाचा लढा नगरसेविका वहिदा नायकवडी , शुभांगी साळुंखे, जयश्री पाटील, रेहाना शेख, सुलताना बेगम, रईसा रंगरेज, हवा आपाजान, आसमा फकीर आदी महिलांनी आक्रमक बनविला आहे. यादरम्यान इरफान शेख, वसीम बलबंड, शोएब पन्हाळकर, शहानवाज फकीर, जाफर शेख, मुनीर मुल्ला, आदी उपस्थित होते.