सांगली : अट्टल मोबाईल चोराला पोलिसांनी केले गजाआड

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन

पलूस शहरातील मोबईल दुकानाचे शटर उचकटून दुकानातील मोबाईल चोरी करणाऱ्या अट्टल चोरट्यास एलसीबीच्या पथकाने अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या चोरट्याकडून ८७ हजार ७९५ रुपयांचे १४ मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.

राधेशाम सुभेदारसिंग रजपूत (वय -२२ रा. पलूस मुळ रा. मुकुटपुरा, जि. आग्रा, उत्तरप्रदेश) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे.
[amazon_link asins=’B07B1B5CVK’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’a9816981-c3f3-11e8-b296-3f0b1e1eeb45′]बुधवारी (दि.२६) रात्री पलूस येथील स्वप्नील मिसाळ (रा. आंधळी) यांचे मोबाईल दुकान अज्ञाताने फोडले होते. त्यावेळी दुकानातील महागडे मोबाईल चोरीला गेल्याची फिर्याद मिसाळ यांनी पलूस पोलिस ठाण्यात दिली होती. पलूस बसस्थानक परिसरात एक व्यक्ती अत्यंत स्वस्त किमतीत मोबाईल विकत असल्याची माहिती एलसीबीचे पोलिस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांना मिळाली होती.त्यांनी पथकाला कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार पथकाने पलूस बसस्थानक परिसरात सापळा रचून राधेशाम रजपूतला ताब्यात घेतले. त्याच्याकडील मोबाईलबाबत कसून चौकशी केल्यानंतर त्याने चोरीची कबुली दिली. त्यानंतर त्याच्याकडून चोरीचे १४ मोबाईल, घड्याळ, लॅपटॉप असा ८७ हजार ७९५ रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्याला पलूस पोलिसांच्या ताब्यात दिले असून त्याच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.
[amazon_link asins=’B072SWSQ1F’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’afb84bb8-c3f3-11e8-93d0-2b42b0990fdd’]

निरीक्षक पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रवीण शिंदे, संदीप पाटील, सागर टिंगरे यांनी ही कारवाई केली.

वेड्यांचा बाजार, पेढ्यांचा पाऊस’ राष्ट्रवादीची सरकारविरोधात बॅनरबाजी

जाहिरात