home page top 1

सांगली : कुंडलापुरात शेत तळ्यात बुडून आई-मुलीचा मृत्यू

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – कवठेमहांकाळ तालुक्यातील कुंडलापूर येथे धुणे धुण्यासाठी शेततळ्यावर गेलेल्या आई आणि मुलीचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. रविवारी सकाळी साडे आठ वाजता ही घटना घडली. साधना किरण देशमुख(वय ३५), उत्कर्षा किरण देशमुख (वय १७ ) अशी मृतांची नावे आहेत.

देशमुख कुटुंबीय मुळचे बाणूरगड (ता.खानापुर ) येथील आहे. ते गेल्या कित्येक वर्षांपासून कुंडलापूरला वास्तव्यास आहेत. किरण देशमुख एका पवनऊर्जा कंपनीत सुरक्षारक्षकाचे काम करतात. त्यांची मुलगी उत्कर्षा कवठेमहांकाळ येथे अकरावीच्या वर्गात शिकत होती. दरम्यान दसऱ्याचा सण तोंडावर आला असल्याने साधना देशमुख व त्यांची मुलगी उत्कर्षा रविवारी सकाळी धुणे धुण्यासाठी गावापासून सुमारे एक ते दीड किलोमीटर अंतरावर डोंगरसोनी रस्त्त्यालगतच्या त्यांच्याच शेततळ्यावर गेल्या होत्या. धुणे धुत असताना उत्कर्षा पाय घसरून पाण्यात पडली. तिला वाचवण्यासाठी आईने पाण्यात उडी घेतली मात्र दोघींनाही पोहता येत नसल्याने त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.

ऐन सणासुदीच्या तोंडावर ही घटना घडल्याने कुंडलापूर गावावर शोककळा पसरली आहे. या घटनेची नोंद कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात झाली आहे.

Visit :- policenama.com

Loading...
You might also like